बर्मिंगहम: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा पहिलाच सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आहे. आता या सामन्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. पण इंग्लंडमधील हवामान विभागाच्या संकेतस्थळानुसार बर्मिंगहममधील सामन्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये थोडीसा नाराजीचा सुर उमटत असल्याचे दिसत आहे.
युके हवामान विभागाचे संकेतस्थळ metoffice.gov.uk यांनी हा अंदाज वर्तवला आहे. उद्या सकाळी थोडासा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच दुपारीही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण तरीही इंग्लंडमधील हवामानाचा अचूक अंदाज लावता येऊ शकत नाही. कारण की, कधी-कधी इथे पाऊस फार जोरात येतो आणि काही वेळातच नाहीसाही होतो. त्यामुळे उद्या सामन्यादरम्यान, नेमके काय होणार? याचा अंदाज लावणे तसे कठीण आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





