👁 6 Views

सोलापूर: लव्ह जिहादच्या संशयावरून सोलापुरात तरुणास बेदम मारहाण , पण तरूणी सांगते

 

सोलापूर : एका मुस्लिम तरुणास टोळक्याकडून लव्ह जिहादचा संशय घेत बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी, १ मार्च सोलापुरातील एम्प्लॉयमेंट चौक परिसरात घडली. मुजाहिद पठाण (वय ३० वर्ष) असे मुस्लिम तरुणाचे नाव असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


मुस्लिम तरुणास खाली पाडून त्याच्या छातीवर लाथा मारल्यामुळे त्याच्या बरगड्याना गंभीर दुखापत झाली. एका हिंदू तरुणीशी तुझे काय संबंध आहेत, तू मुस्लिम आहेस, असे म्हणत त्याला आधी जाब विचारण्यात आला आणि नंतर त्याला जबर मारहाण करण्यात आली आहे. तसेच पीडित हिंदू तरुणीस देखील दमदाटी देत तिच्या नातेवाईकांना तुमच्या मुलीचे अनैतिक संबंध असल्याची खोटी माहिती या हिंदू टोळक्याकडून देण्यात आली.


पीडित तरूणी व मुस्लीम तरुण मुजाहिद पठाण याचे गेल्या अनेक वर्षांपासून कौटुंबिक ओळख आहे. हे दोघे सोलापुरातील एका खाजगी कार्यालयात काम करत असून मुजाहिद याचे लग्न झाले आहे, तर पीडित तरूणी अविवाहित व शिक्षण घेत आहे. शैक्षणिक कामानिमित्त पीडित हिंदू तरूणीने मुजाहिदला १ मार्च रोजी सोलापूरातील एम्प्लॉयमेंट चौक येथे बोलावले होते. कामानिमित्त वेळ लागत असल्याने दोघेही आईस्क्रीम खाण्यासाठी आईस्क्रीम पार्लरमध्ये गेले होते.

दोघेही आईस्क्रीम खात असताना एका हिंदू संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी त्या ठिकाणी आले. त्यांनी पीडित तरुणीला, तु हिंदू असून मुस्लीम तरुणाशी का बोलत आहेस असा जाब विचारण्यास सुरुवात केली. पीडित तरुणीने अनेक विनवण्या केल्या, पण संघटनेच्या तरुणांकडून काहीएक ऐकण्यात आले नाही. ओळखपत्र पाहून तरूणीच्या नातेवाईकांना हिंदू संघटनेच्या टोळक्याकडून तुमच्या मुलीचे मुस्लीम तरुणाशी अनैतिक संबंध आहेत असे सांगत तिला आईस्क्रीम पार्लरमधून बाहेर काढले. त्यानंतर मुजाहिद पठाण या तरुणाला मारहाण करत त्याला एम्प्लॉयमेंट चौकातील बाजूच्या गल्लीत नेले आणि त्याठिकाणी तरुणाला बेदम मारहाण केली.


लव्ह जिहाद किंवा अनैतिक संबंधाच्या नजरेने पाहू नये
हिंदू संघटनेकडून मारहाण झाल्यानंतर पीडित तरुणीने मुस्लिम तरुणाची बाजू घेतली आहे. आमचे अनैतिक संबंध नसून कौटुंबिक व भाऊ बहिणीसारखे संबंध असल्याची माहिती पीडित तरुणीने दिली. समाजात अनेक हिंदू मुलींचे मुस्लिम धर्मातील नागरिकांशी, तरुणांशी या ना त्या कारणाने किंवा काही कामानिमित्त संपर्क येत असतो. त्यामुळे लव्ह जिहाद किंवा इतर अनैतिक संबंध आहेत या नजरेने कोणीही पाहू नये, असा सामाजिक संदेशही पीडित तरूणीने दिला. माझ्यासोबत मुस्लिम तरुण बोलत बसला या कारणाने मारहाण करणाऱ्या हिंदू संघटनांविरोधात तिने बाजार पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल केल्याची माहितीही तिने दिली.

जय श्रीरामचे नारे देत आणखी हिंदू तरुणांना बोलावले
मुजाहिद पठाण या मुस्लिम पीडित तरुणाने सांगितले की, एम्प्लॉयमेंट चौकातील एका गल्लीत मला घेऊन गेले आणि मारहाण करू लागले. त्यावेळी त्यांनी मोबाईल वरून फोन करून जय श्री रामचे नारे देत, आणखीन हिंदू तरुणांना बोलावून मला मारहाण केली. मला असह्य वेदना होत असतानाही त्यांनी मला खाली पाडून तुडवले आणि जवळपास अर्धा तास मला मारहाण केली. काही वेळाने मी संधी साधून माझ्या वडिलांना फोन करून बोलावून घेतले. वडिलांनी एम्प्लॉयमेंट चौक येथे येऊन माझी सुटका केली व मला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *