👁 12 Views

India vs Pak Live: पाकिस्‍तानला 320 धावांचे आव्‍हान, शेवटच्‍या षटकांत भारताची धडाकेबाज फलंदाजी

बर्मिंगहॅम – भारताने पाकिस्‍तानला विजयासाठी 320 धावांचे आव्‍हान दिले आहे. पावसाने सामन्‍यात दोनदा व्‍यत्‍यय आणल्‍यामुळे पंचानी सामना 48 षटकांचा खेळवण्‍याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्‍या भारतीय फलंदाजांनी धीम्‍या गतीने खेळास सुरुवात केली. सलामीवीर रोहित शर्माने शानदार फलंदाजी करताना 91 धावा केल्‍या. रोहित शतक पूर्ण करणार असे वाटत असतानाच धावबाद झाला.
40व्‍या ओव्‍हरपर्यंत भारताच्‍या 200 धावा झाल्‍या होत्‍या. त्‍यानंतर मात्र क्रिजवर असलेल्‍या विराट व युवराज सिंगने आक्रमक फलंदाजी करत भारताला 300 धावांचा टप्‍पा गाठून दिला. युवराजने चमकदार खेळाचे प्रदर्शन करताना 32 चेंडूत अर्धशतक ठोकले. तो 53 धावांवर आऊट झाला. विराट कोहलीनेही आक्रमक फलंदाजी करताना 68 चेंडूत 81 धावा केल्‍या. विराट शेवटपर्यंत नॉटऑऊट राहिला. 48 षटकांचा खेळ संपला तेव्‍हा भारताने 3 विकेट गमावून 319 धावा केल्‍या होत्‍या.
सचिनची कॉमेंट्री
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्ताने तब्बल 28 महिन्यानंतर भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ समोरा-समोर आले आहेत. या सामन्याच्या सुरुवातील पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण 10 सामने झाले. यापैकी 6 सामने भारतानेच जिंकले आहेत. विशेष म्हणजे, या सामन्याची कामेंट्री मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर करत आहे.
अश्विन आणि रहाणे टीमच्या बाहेर…
या सामन्यात भारतीय टीमच्या प्लेइंग इलेवनमध्ये आर. अश्विन, मो. शमी आणि अजिंक्य रहाणे यांना समाविष्ट करण्यात आलेले नाही. भारत हा सामना तीन फुल टाईम बॉलर्स आणि तीन ऑलराउंडर खेळाडूंना घेऊन खेळत आहे.
– यात बॉलिगची जबाबदारी उमेश यादव, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर असणार आहे. तसेच ऑलराउंडरमध्ये हार्दिक पंड्या, केदार जाधव आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे.
– बॅटिंगची जबाबदारी शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, युवराज सिंह आणि एम.एस. धोनीवर राहणार आहे.
अडीच वर्षांनंतर आमने-सामने
– भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ 28 महिन्यांनंतर वनडे सामन्यात एकमेकांशी भिडत आहेत. 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये फेब्रुवारीच्या शेवटी दोन्ही संघांत सामना रंगला होता.
– भारताने तो सामना 76 धावांनी जिंकला होता. मात्र, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचे पारडे जड आहे. या ट्रॉफीत दोन्ही संघांमध्ये 3 सामने झाले असून त्यापैकी 2 सामने पाकिस्तानने जिंकले आहेत. भारताने 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकविरुद्धचा सामना ज्या मैदानावर जिंकला होता. त्याच ठिकाणी रविवारची मॅच आहे.
प्लेइंग इलेव्हन
भारत – रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (c), युवराज सिंह, एम.एस. धोनी (wk), केदार जाधव, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि जसप्रीत बुमराह…
पाकिस्तान – अजहर अली, अहमद शहजाद, बाबर आजम, मो. हफीज, शोएब मलिक, सरफराज अहमद (c, wk), इमाद वसीम, शादाब खान, मो. आमिर, वहाब रियाज आणि हसन अली…

रोहित शर्माने 71 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.

रोहित शर्माने सामन्‍यात भारतातर्फे पहिला चौकार लगावला.

रोहित शर्माने सामन्‍यात भारतातर्फे पहिला चौकार लगावला.

मो. आमिरच्‍या गोलंदाजीवर शॉट लगावल्‍यानंतर रोहित शर्मा. 

मो.आमिरने टाकलेल्या पहिल्या ओव्हरमध्ये भारताच्या शून्य धावा

युरिनरी ब्लडरच्या उर्जाप्रवाहासाठी Acuyoga-2

1. दंडासनात बसून दोन्ही पाय गुडघे उचलून जवळ घ्यावेत
2. दोन्ही हात गुडघ्याच्या मागे UB-38, 39, 40 यावर दाब येईल असे धरावे.
3. दोन्ही हात गुडघ्याच्या मागे धरलेले स्थितीत मागे सावकाश पडावे.
4. पाठीवर पडल्यानंतर कंबर वर उचलून गुडघ्यातूनपाय सरळ करावे.
5. पाय पुनः गुडघ्यात वाकवून 3 ते 2 नंतर 2 या स्थितीत यावे.
आपल्या क्षमतेनुसार 1 ते 2 मिनिटे करावे. सराव नंतर 2,3,4 नंतर 3 व 2 या अवस्था न थांबता सहज करता येतात. UB-11 ते UB-60 पर्यंत सर्वच बिंदूना दाब आणि ताण मिळतो.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *