बोरी-जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये शेतकरी संपाला पाठिंबा देत शांततेच्या मार्गाने कडकडीत बंद पाळण्यात आला. आळेफाटा, पिंपळवंडी, निमगाव सावा, राजुरी, बोरी, साळवाडी आदी गावांच्या परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देत कडकडीत बंद पाळण्यात आला. या गावांमध्ये दवाखाने व मेडिकल वगळता दुकाने व बाजारपेठा बंद ठेऊन सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.
बोरी गावामध्ये शेतकरी संपाला पाठिंबा देत शेतकऱ्यांनी मोर्चा काढून निषेध सभा घेतली. सभेमध्ये शेतकऱ्यांना साठ वर्षांच्या नंतर निवृत्ती वेतन द्या, सातबारा कोरा करा, स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू करा, सरकारी नोकरांप्रमाणे शेतकऱ्यांनाही सर्व सुविधा द्या, शेतीमालाला हमी भाव द्या, अशा विविध मागण्या शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी मोहन पटाडे, संदीप कोरडे यांनी केल्या.
सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर शेतकऱ्यांची कृती समिती स्थापन करून संप सुरूच ठेवण्यात येईल, असे शेतकऱ्यांनी सांगितले. सभेनंतर शेतकऱ्यांनी गावातील नागरिकांना मोफत दुधाचे वाटप केले. साळवाडी गावामध्ये मुक्ताई डेअरीचे दररोज सुमारे 16 हजार लिटर दूध संकलन होते. दुधाच्या पिशव्यांची पॅकिंग करून शिवनेरी दूध या नावाने मुंबईमध्ये पुरवठा केला जातो. परंतु स्वयंस्फूर्तीने या डेअरीचे 1 तारखेपासून दूध संकलन बंद ठेऊन शेतकरी संपाला पाठिंबा दर्शविण्यात आला आहे, असे या डेअरीचे संचालक कैलास काळे, रामदास काळे, संतोष काळे यांनी सांगितले.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





