👁 11 Views

शेतकरी संपाची तीव्रता वाढतेय

शिरूरमध्ये मोटारसायकल रॅली : पुणे-नगर रस्ता रोखला
शिरूर – शेतकरी संपाची तीव्रता रोज वाढत असून आज (मंगळवारी) शिरूर तालुक्‍यातील शेतकरी संघटनेच्या वतीने मोटारसायकल रॅली काढून शिरूर तहसीलदार कार्यालय समोरील पुणे-नगर रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संपावर गेले असून संपाचा सहावा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांची शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी, अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढविणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बाळासाहेब घाडगे यांनी दिला.
कर्जमुक्‍तीसह विविध मागण्यांसाठी शेतकरी संपावर गेले असून आज संपाच्या सहाव्या दिवशी शिरूर तालुका शेतकरी संघटनेच्यावतीने शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुणे-नगर रोरस्त्याने तहसील कार्यालयावर निषेधाच्या घोषणा देत मोर्चा काढुन तहसील कार्यालयासमोरील पुणे-नगर रस्त्यावर एक तास रस्ता रोको आंदोलन करून मागण्यांचे निवेदन तहसीलदार रणजीत भोसले यांना दिले.
यावेळी तालुका अध्यक्ष बापूसाहेब शिवले, पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुहास काटे, सरचिटणीस सुभाष जाधव, कार्याध्यक्ष बाबासाहेब थिटे, श्रीनिवास घाडगे, दिलीप बेंद्रे, विजयसिंह मोकाशी, रूपेश घाडगे, तुकाराम मचाले, तात्यासाहेब सोनवणे, ज्ञानदेव शिंदे, बबन लगड, मनोज घाडगे, मानसिंग बोरकर, सिद्धेश्‍वर म्हस्के, लहु साळुंके, दत्तात्रय घाडगे, महादेव वाळुंज, वाल्मिक गांधले, नानासाहेब फलके, सावळेराम फराटे, राजेंद्र हराळ आदिंसह तालुक्‍यातील शेतकरी अंदोलनात सहभागी झाले होते.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *