👁 10 Views

पोलिस पाटील हा प्रशासनातील महत्वाचा दुवा

भोर- ग्रामीण भागातील दैनंदिन घडामोडींची संपूर्ण माहिती महसूल आणि पोलीस खात्याला देणारा पोलीस पाटील हा प्रशासनातील महत्वाचा दुवा असल्याचे प्रतिपादन भोरच्या उपविभागिय अधिकारी मोसमी बर्डे-चौगुले यांनी केले.
भोर-वेल्हे तालुक्‍यातील 175 गावांच्या रिक्‍त असलेल्या पोलीस पाटलांचे सोडतपद्धतीने आरक्षण काढण्यासाठी आयोजित कार्यक्रमात चौगुले बोलत होत्या. यावेळी वेल्हेच्या तहसीलदार पी. डी. उबाळे, भोर तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष हाराळे, भोरचे निवासी नायब तहसीलदार बाळासाहेब शिरसाट, भोर तालुका पंचायत समितीचे उपसभापती लहूनाना शेलार, जिल्हापरिषद सदस्य विठ्ठल आवाळे , पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल खोपडे उपस्थित होते.
या वेळी भोर तालुक्‍यातील 102 व वेल्हे तालुक्‍यातील 73 अशा एकुण 175 पोलीस पाटलांचे रिक्‍त असलेल्या पदांच्या चिठ्ठ्या टाकुन आरक्षण सोडत पद्धतीने काढण्यात आले. यावेळी या आरक्षणा विषयीची संपुर्त चित्रफित उपस्थितांना दाखवण्यात आली. गावनिहाय आरक्षणाची माहिती गावच्या ग्रामपंचायतींच्या चावडीवरील नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे प्रांताधिकारी बर्डे- चौगुले यांनी सांगितले.
पोलीस पाटील पदासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्‍तीचे वय 25 ते 45 पर्यंत असावे, तो / ती एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण आसला पाहिजे, गावचा कायम रहिवासी असला पाहिजे, त्याचे/ तीचे नावे मालकिची जमिन असली पाहिजे, शारिरीक दृष्ट्या सक्ष आसला पाहिजे, तो/ती शासकिय थकबाकीदार नसावा, छोटे कुटुंब असल्याचे प्रतिज्ञा पत्र त्यास द्यावे लागेल अशा प्रकारच्या अट आहे. या पदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत 7 ते 30 जून असुन दाखल अर्जांची छाननी दि.22 व 23 जून रोजी होणार आहे. पात्र उमेदवारांची यादी दि.27 जून रोजी प्रसिद्ध होईल. तसेच उमेदवारांची लेली परीक्षा, कागदपत्रांची पडताळणी व तोंडी मुलाखत या सारख्या बाबी जुलै महिन्यात होणार आहेत असून पात्र उमेदवारांची निवड 12 जुलै रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर नियुक्‍तीचे आदेश दि. 13 जुलै रोजी देण्यात येतील असे बर्डे-चौगुले यांनी सांगितले.
चौकट : 42 गावांची सुरक्षा पाटलीणबाईंच्या हाती
भोर व वेल्हे तालुक्‍यातील पोलीस पाटलांच्या आरक्षात 38 टक्के महिलांना पोलीस पाटील पदासाठीचे आरक्षण जाहीर केल्याने आता 42 गावांच्या पोलीस पाटील पदावर महिलां विराजमान होणार आहे.
भोर, वेल्हे पोलीस पाटील आरक्षण
एस.सी.34, एस.टी.22, वि.मा.प्र.6, वि.ज.8, भ,ज.-ब 8, भ.ज.- क- 6, भ.ज.- ड- 6, इ.मा.व. 43, आणि खुला वर्ग 42.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *