👁 13 Views

ग्रामीण भागातील गरीब व गरजु विद्यार्थ्यांसाठी पुण्यात वसतिगृह प्रवेश



पुणे : पुण्यात उच्चशिक्षणासाठी येणा-या ग्रामीण भागातील गरजू आणि होतकरु विद्यार्थ्यांना अल्पदरात निवास, भोजनासाठी येथील विद्यार्थी साहाय्यक समितीच्या वसतिगृहामध्ये प्रवेश मिळू शकतो, गेली साठ वर्ष ग्रामीण विद्यार्थ्यांना पुण्यात अल्प दरात निवास, भोजन आणि व्यक्तिमत्व विकासासाठी ही संस्था काम करीत आहे. संस्थेची पाच सुसज्ज वसतिगृह असून सुमारे ४५० विद्यार्थी आणि ३०० विद्यार्थिनी येथे राहतात. उच्च शिक्षणातील विविध विद्याशाखांसाठी पुण्यात प्रवेश मिळाल्यावर समितीमध्ये प्रवेश मिळू शकेल. प्रवेश अर्जासोबतची कागदपत्रे तपासून मुलाखत घेतली जाते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कमवा व शिका योजनेत सहभाग नोंदवणे, व्यक्तिमत्व विकासाच्या विविध उपक्रमात सहभाग नोंदवणे अनिवार्य असते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात भर पडल्याचे येथील कार्यकर्त्यांचे व असंख्य माजी विद्यार्थ्यांचे निरीक्षण आहे. या संस्थेचे कामकाज समाजातून मिळणा-या आर्थिक मदतीवर सुरु असल्याने येथील नियमांची काटेकोर अमंलबजावणी होते.
गरजू विद्यार्थी–विद्यार्थीनींनी संस्थेच्या सुविधांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे. प्रवेश अर्जासाठी संपर्क: विद्यार्थी साहाय्यक समिती, ११८२/१/४ शिवाजीनगर, फर्ग्युसन रस्ता, पोलिसग्राऊंडजवळ, पुणे ४११००५
(दुरध्वनी -०२०-२५५३३६३१, २५५३३७७८) www.samiti.org
 समितीचे प्रवेश अर्ज व माहितीपत्रक १ जूनपासून ऑनलाईन www.samiti.org या संस्थेच्या वेबसाईटवर तसेच कार्यालयात (सकाळी ११ ते सायं. ४ वा.) मिळतील.
संस्थेचा पत्ता पुढीलप्रमाणे :
(मुलींचे वसतिगृह)                                                                                       (मुलांचे वसतिगृह)
विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे                                                                 विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे
डॉ.अ.श.आपटे वसतिगृह                                                                           लजपतराय विद्यार्थी भवन
११८२/१/४, शिवाजीनगर,                                                                      १०३ अ, शिवाजी हौ.सो.मागे
फर्ग्युसन कॉलेज रोड, पोलिस ग्राऊंड जवळ,                                                  सेनापती बापट रस्ता
बॅंक ऑफ महाराष्ट्र ’यशोमंगल’ शेजारी,                                                         पुणे–४११०१६.फोन:(०२०) २५६३९३३०
पुणे – ४११००५ फोन: (०२०) २५५३३६३१                                           
Email : info@samiti.org
Website: www.samiti.org


Jivraj M. Chole,

Mob : 9767789529

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *