👁 6 Views

पंढरपूर सिंहगड मध्ये “स्पर्धा परीक्षा व गेट परीक्षेतील करिअरच्या संधी” याविषयावर व्याख्यान संपन्न

पंढरपूर: प्रतिनिधी

एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर महाविद्यालयात गुरुवार दिनांक ९ मार्च २०२३ रोजी “स्पर्धा परीक्षा व गेट परीक्षेतील करियरच्या संधी” या विषयावर प्रा. शंकर वादणे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते अशी माहिती प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.


  या व्याख्यानाच्या सुरवातीस महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांचे हस्ते प्रा. शंकर वादणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. 


  महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे व उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व गेट परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यांना संबोधित केले. 


   यावेळी बोलताना प्रा. शंकर वादणे म्हणाले, स्पर्धा परीक्षेचा अथवा गेट परीक्षेचा अभ्यास करीत असताना अभ्यासामध्ये सातत्य असणे आवश्यक आहे. गेट परीक्षेचा अभ्यास कसा कराव तसेच ईएसई, गेट, एस. एस. सी. आर आर बी आणि पी एस यु एस या बाबत महत्वपूर्ण केले.


 यावेळेस डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. अतुल आराध्ये, प्रा. धनश्री भोसले, प्रा. अजित करांडे. प्रा. सिद्धेश्वर गंगोंडा आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन कुमारी रुक्मिणी शिर्के हिने केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *