👁 14 Views

मुंबईत येत्या २४ तासात मुसळधार पावासाचा अंदाज

मुंबई : मुंबईत येत्या २४ तासात मुसळधार पावासाचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलाय. शिवाय मान्सूनच्या आगमनासाठीही पोषक वातावरण तयार होत असल्याचंही वेधशाळाने म्हटलंय. 

शिवाय तळकोकणात रखडलेला मान्सून आता रत्नागिरीच्या हर्णे बंदरात दाखल झालाय आणि येत्या २४ ते ४८ मुंबई आणि मध्य मध्य महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल असंही वेधशाळेनं म्हटलंय.  
दरम्यान आज सकाळ पासून मुंबईत ढगाळ वातावरण आहे. गुरुवारी रात्री मुंबई उपनगरात मान्सून पूर्व पावसानं दमदार हजेरी लावली…आज सकाळपासून मात्र पुन्हा एकदा सूर्य आणि ढगांचा लपंडाव मुंबईकर अनुभवत आहेत. 

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *