👁 10 Views

‘ट्रिपल’ तलाक देणाऱ्यास 2 लाख रुपये दंड

तुर्क पंचायतीचा ऐतिहासिक निर्णय
संभल (उत्तर प्रदेश), दि.12-ट्रिपल-तिहेरी तलाक हा सध्याचा एक मह्त्त्वाचा-गाजत असलेला विशेष आहे. मुस्लिम महिलांवर जुलूम करणारी ट्रिपल तलाक ही पद्धत बंद करून टाकावी अशी सर्वच क्षेत्रांतून मागणी केले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर उत्तर प्रदेशतील संभल मधील एका तुर्क पंचायतीने एक मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ट्रिपल तलाक देणाऱ्या एका व्यक्तीस 2 लाख रुपये दंड आणि पत्नीस 60 ह्जार रुपये मेहरची रक्कम देण्याचा आदेश दिला आहे. 52 गावांमधील तुर्क समुदायाच्या लोकांनी एका मदरशात या संदर्भात पंचायतीचे आयोजन करून हा निर्णय घेतला.
दहा दिवसांपूर्वीच 45 वर्षे वयाच्य एका व्यक्तीचा 22 वर्षांच्या युवतीशी विवाह झाला होता. दोघांमध्ये लगेचच काही वाद झाल्याने त्याने ट्रिपल तलाक देऊन पत्नीस माहेरी जाण्यास सांगितले. पत्नीच्या घरच्यांनी याविरोधात पंचायतीत तक्रार केली. त्यावर पंचायतीने 53 गावांतील लोकांची बैठक बोलावली आणि आरोपीला 2 लाख रुपये दंड आणि पत्नीला 60 हजार रुपये मेहरची रक्कम म्हणून देण्यास सांगितले. त्याशिवाय विवाहात मिळालेले सर्व सामान पत्नीला परत करण्यास सांगितलेले आहे. तुर्की समुदायाने यापूर्वीच ट्रिपल तलाकवर बंदी आणलेली आहे आणि विवाहात हुंडा घेण्यावरही बंदी आणलेली आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111