👁 12 Views

मेट्रोच्या उद्घाटनाला ‘मेट्रो मॅन’लाच आमंत्रण द्यायला सरकार विसरलं

नाराज नसल्याची ई. श्रीधरन यांची प्रतिक्रिया

दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे प्रमुख सल्लागार ई. श्रीधरन

पंतप्रधान नरेंद्र मोदी कोचीतील मेट्रोचे उद्घाटन करणार आहेत. मात्र मेट्रो उद्घाटन कार्यक्रमात केंद्र सरकारकडून ‘मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन यांना निमंत्रित करण्यात आलेले नाही. गुरुवारी ई. श्रीधरन यांनी कोची मेट्रोची पाहणी केली. त्यावेळी त्यांना याबद्दल विचारण्यात आले. यावर बोलताना ‘मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमंत्रणावरुन वाद निर्माण करण्याचे काहीच कारण नाही. निमंत्रण न दिल्याने मी निराशा झालेलो नाही. पंतप्रधानांची सुरक्षा सर्वाधिक महत्त्वाची आहे,’ असे ई. श्रीधरन यांनी म्हटले आहे.
केरळ सरकारने बुधवारी पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिले होते. ई. श्रीधरन यांच्या नावाचा समावेश मेट्रो उद्घाटनासाठी आमंत्रित केलेल्या पाहुण्यांच्या यादीत करण्यात यावा, असे केरळ सरकारने पत्रात म्हटले होते. श्रीधरन दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे प्रमुख सल्लागार होते. श्रीधरन यांच्या नेतृत्त्वाखाली दिल्ली मेट्रो अवघ्या चार वर्षांमध्ये पूर्ण झाली होती. दिल्ली मेट्रोचे काम अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने पूर्ण होण्यात श्रीधरन यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळेच त्यांना metro man म्हटले जाते. कोची मेट्रोच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी केरळात येणार आहेत. मात्र या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेवर ‘मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन यांचे नाव नसल्याने केरळमध्ये वाद निर्माण झाला आहे.
कोची मेट्रोच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका वादग्रस्त ठरली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून तयार करण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेवर विरोधी पक्षनेते रमेश चेन्नीथाला आणि स्थानिक आमदार पी. टी. थॉमस यांच्या नावांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. मेट्रो उद्घाटन कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेसाठी केरळ सरकारकडून १७ जणांची नावे पंतप्रधान कार्यालयाा देण्यात आली होती. यामध्ये ई. श्रीधरन, चेन्नीथाला, थॉमस आणि मुख्य सचिव नैलिन नेट्टो आणि इतरांच्या नावांचा समावेश होता.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *