पंढरपूर शहर व तालुक्यातील अनेक शासनमान्य अनुदानित तसेच स्वयंअर्थसहहायीत व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये 5 मे 2017 रोजी दिलेल्या आदेशानुसार शाळांच्या दर्शनी भागात तक्रार पेटी बसविण आवश्यक असतानाही अनेक शाळांच्या व्यवस्थापनाकडुन तक्रार पेटी बसविण्याबाबत टाळाटाळ केली जात आहे तरी शासानाच्या आदेशाचे पालन करणार्या शाळांवर कारवाई केली जावी अशी मागणी अदिम विकास परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.याबाबतचे एक निवेदन येथील गटशिक्षणाधिकारी कार्यायात देण्यात आले आहे.
या बाबत अधिक माहिती देताना अदिम विकास परिषदेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष नागेश अधटराव म्हणाले की, शासनाच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने या बाबत स्पष्ट आदेश देवूनही कार्यवाही होताना दिसून येत नाही.या आदेशानुसार शाळांच्या दर्शनी भागात तक्रार पेटी बसविणे.ही तक्रारपेटी आठवडयाच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी उघडण्यात यावी.ही तक्रार पेटी उघडताना प्राचार्य,पालक प्रतिनिधी,विद्यार्थी प्रतिनिधी आदींच्या उपस्थितीत उघडण्यात यावी,गंभीर व संवेदनशिल तक्रार असेल तर त्वरीत पोलीसांचे सहाय्य घ्यावे,गंभीर तक्रारीबाबत क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर पाठपुरावा केला जावा.तक्रारदाराचे नाव गुप्त राहील याची दक्षता घेण्यात यावी यासह अनेक महत्वपुर्ण तरतुदींचा समावेश शासनाच्या आदेशात करण्यात आला आहे.मात्र अनेक शाळा याबाबत अनिभिज्ञ असून त्यामुळेच आपण गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे हे निवदेन देवून कार्यवाहीची मागणी करत असल्याचे नागेश अधटराव यांनी सांगीतले.
हे निवेदन देताना उत्तम चव्हाण,धीरज परचंडराव,बाळासाहेब देवकर,संभाजी शिंदे-नाईक,मंगेश क्षिरसागर,रंगनाथ कोणीकर आदी उपस्थित होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




