क्रमश :
एक्यूयोगा (Acuyoga)
५) मूत्रविकार आणि जननेंद्रियाच्या विकार.
यात मुख्यत्वे मूत्राशय व किडनीचे एक्यूयोगा करावे. तसेच गव्हर्निंग व्हेसल, स्प्लिनचा एक्यूयोगा करावा.
एक्यूयोगामधील २९ नं. कृती करावी.
६) कानाचे आजार, बहिरेपणा, चक्कर :
एक्यूयोगा मधील १ ते ४ हि क्रिया करावी. गाल ब्लॅडर चॅनेलचा एक्यूयोगा करावा. कंगवा कानाच्यावरून पाठीमागे दिवसातून तीन वेळा फिरवावा.
७) डोळ्याच्या आजारासाठी.
लिव्हर आणि गाल ब्लॅडर चॅनेलचा एक्यूयोगा करावा. डोळे बंद करून अनामिकेने (रिंग फिगर) करंगळी शेजारील बोटाने बुबुळाला काळ्या व पांढऱ्या भागाला हलका गोलाकार मसाज करावा.
हातचा अंगठा डोळ्यासमोर धरावा श्वास घेऊन डोळे मोठे करून अंगठ्याकडे पहावे. श्वास सोडल्यावर डोळे गच्चा मिटावे. पुनः : श्वास घेऊन डोळे मोठे करून अंगठ्याकडे नं फाटा लांब पाहावे. हि क्रिया १० ते ३० वेळा क्षमतेनुसार करावी. यामुळे डोळ्याचे सॅन्यु (सिलिआरि मसल) कार्यक्षम होतात व चष्मा जाण्यास मदत होते. डाव्या हातच्या अंगठ्याकडे हात ताठ करून हात गोल फिरवीत अंगठ्याकडे मान नं हलवता पाहावे. हीच क्रिया उजव्या हाताने करावी.





