👁 11 Views

तोयबा, जैशच्या महिला बॉम्बची भारतात घुसखोरी


मोठ्या आत्मघाती हल्ल्याची योजना
नवी दिल्ली, १६ जून
लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद यासारख्या पाकधार्जिण्या दहशतवादी संघटनांच्या महिला बॉम्ब भारतात घुसखोरी करून आल्या असून, देशात विविध ठिकाणी मोठे आत्मघाती हल्ले करण्याची त्यांची योजना आहे, असा इशारा केंद्रीय गुप्तचर संस्थांनी दिला आहे.
या अहवालानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने देशभरात अतिसतर्कतेचा इशारा जारी केला आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या मदतीने या मानवी बॉम्ब बनलेल्या या महिलांना पाकच्या वायव्य सरहद्दीतील खैबर पख्तूनख्वा प्रांतात दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी म्हटले आहे.
सुमारे सात ते आठ महिला बॉम्ब भारतात दाखल झाल्या आहेत. मुंबईवरील २६/११ रोजीच्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदचा मुलगा तल्ला सईद याच्या इशार्‍यावर या महिला काम करीत आहेत. त्याच्याच मार्गदर्शनात त्यांना दहशतवादाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. भारतातील तेल शुद्धीकरण कंपन्या, अणुभट्ट्या, मेट्रो स्थानके, शस्त्रभंडार, लष्कराची महत्त्वाची तळे आणि धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्याची आयएसआयची योजना असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दिल्ली पोलिसांनी अलीकडेच पाकी आयएसआयशी संबंधित काही हस्तकांना अटक करून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्यांच्या चौकशीतून पाकच्या या घातक कटाची माहिती समोर आली आहे. भारतीय हवाई दलातील एका अधिकार्‍याशी एका महिलेने सोशल मीडियावरून जवळीक वाढविण्याचा प्रयत्न केला होता. या महिलेने आपण ब्रिटनची रहिवासी असल्याचे आपल्या फेसबुक अकाऊंटवर नमूद केले होते. मात्र, चौकशीत हे अकाऊंट आयएसआयच्या पेशावर येथील तळाच्या परिसरातून हाताळण्यात येत असल्याचे उघड झाले होते. दामिनी मॅकनॉट नावाची ही महिला सोशल मीडियावर या अधिकार्‍याशी गोड बोलून महत्त्वाची माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत होती, असेही समोर आले आहे. (वृत्तसंस्था)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *