👁 11 Views

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने डेंगु सदृष रोगावर नियंत्रणासाठी युद्धपातळीवर मोहिम

पंढरपूर
शहरामध्ये डेंगु सदृष रुग्ण आढळुन आल्याने नगरपरिषदेने या रोगाला आळा घालण्यासाठी
विशेष मोहिम हाती घेतली असुन शहरात व उपनगरात फवारणी करण्यात येत आहे. तसेच फॉगिंगमशिनद्वारे
धुर फवारणी करण्याचे काम हाती घेतले असुन जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय व पंढरपूर
नगरपरिषदेच्यावतीने संयुक्त मोहिम हाती घेण्यात आली आहे. गेले ८ दिवस शहरात पाऊस
पडत असल्याने पाण्याच्या डबक्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच शहरातील घरांच्या
गच्चीवर, पाण्याच्या टाकीमध्ये इडिस इजिप्टाय या  डेंगु सदृष्य डासांची होणारी उत्पत्ती
रोखण्यासाठी व त्यावर आळा घालण्यासाठी कंटेनर सर्व्हेचे काम हाती घेण्यात आले असुन
शहरातील प्रत्येक घरात जावुन हा सर्व्हे करण्यात येणार आहे. तसेच बीटीआय लिक्विडची
फवारणी करण्यात येणार आहे. तसेच घरगुती पाणी साठवुन हौदामधुन टेमीफॉसचे द्रावण
टाकण्यास सुरुवात केली आहे. तरी शहरातील नागरीकांनी हिवताप, डेंगुताप व किटकजन्य
आजार होवु नये म्हणुन आपल्या घरातील सर्व प्रकारचे पाणी साठे आठवड्यातुन दोन वेळा
घासुन पुसुन स्वच्छ आणि कोरडे करुनच पाणी भरावे. तसेच आठवड्यातुन एक दिवस कोरडा
दिवस म्हणुन पाळावा. तसेच नागरीकांनी आपल्या परिसरात या रोगाची लागण होवु नये
म्हणुन घराच्या गच्चीवर अथवा घराच्या परिसरात निकामी प्लास्टीक, लोखंडी पत्र्याचे
डबे, नारळाच्या करवंट्या, गाडगी, गाडीचे टायर व भंगार सामान त्वरीत काढुन टाकावेत.
सदरचा इडिस ईजिप्टाय या डासाची उत्पत्ती ही स्वच्छ पाण्यातच होत असल्याने या बाबतची
दक्षता नागरीकांनी असे आवाहन नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले, मुख्याधिकारी अभिजीत
बापट, आरोग्य समिती सभापती सौ.भाग्यश्री सचिन शिंदे यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *