पंढरपूर नगरपरिषद महिला व बालकल्याण समितीच्यावतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मोफत महिला आरोग्य तपासणी शिबीर व वृक्षारोपण कार्यक्रम सौ.सिमाताई प्रशांत परिचारक यांच्या शुभहस्ते, नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व सौ.विनयाताई उमेश परिचारक, उपनगराध्यक्षा सौ.सुजाताताई त्रिंबक बडवे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.अर्चना नवनाथ रानगट, आरोग्य समितीच्या सभापती भाग्यश्री शिंदे व जेष्ठ नेते व सामाजिक कार्यकर्ते नागेश शिंगण सर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या शिबीरामध्ये उपस्थित असलेल्या ३०० महिलांची मोफत शुगर, हिमोग्लोबीन, थाईरॉईट, ब्लड ग्रुप व प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली व त्या भागात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी उपस्थित असणा-या महिलांना वृक्षारोपणाकरिता विविध प्रकारची रोपे देण्यात आली. या महिला मेळ्याव्यामध्ये डॉ.वर्षा काणे यांनी महिला आणि कॅन्सर डॉ.संगिता पाटील भोसले यांनी महिलांचे मानसिक आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच या प्रसंगी डॉ.प्रताप बाड यांनी महिलांची रक्तदाव व इतर तपासण्या केल्या. डॉ.सदानंद पाटील यांनी रक्तदाना बद्दल माहिती देवुन रक्त तपासणीची गरज का आहे याची माहिती दिली. या कार्यक्रमास नगरसेविका रेणुका घोडके, सुप्रिया डांगे, अनुसया शिरसट, शकुंतला नडगिरे तसेच पक्षनेते गुरुदास अभ्यंकर, शिक्षण समिती सभापती संजय निंबाळकर, नारायण शिंगण, विशाल मलपे, विवेक परदेशी, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, माजी नगरसेवक तुकाराम राऊत, काका पवार, सचिन शिंदे, धर्मराज घोडके, भगत साहेब, योगेश गंगाधरे, व योगेश काळे, दर्शना अभ्यंकर हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन महिला व आरोग्य समितीच्या सभापती सौ.अर्चना नवनाथ रानगट व सामाजिक कार्यकर्ते नवनाथ रानगट यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व आशा वर्कर यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार डॉ.राजश्री सालविठ्ठल यांनी केलं. बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111



