नवी दिल्ली : भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक संपली आहे. या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराविषयी चर्चा झाली. रामनाथ कोविंद हे राष्ट्रपतीपदाचे भाजपचे उमेदवार असणार आहेत. रामनाथ कोविंद हे बिहारचे राज्यपाल आहे. कोविंद यांच्या नावाची घोषणा भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी केली. कोविंद हे दलित समाजाचे आहेत. ते मुळचे कानपुर, उत्तर प्रदेशचे आहेत. मागील ३ वर्षापासून ते बिहारचे राज्यपाल आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीला अमित शाह, नितीन गडकरी, सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडू हे दिग्गज नेते उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्याचे सर्वाधिकार पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना देण्यात आले होते.
भाजपनं आपल्या सर्व खासदारांची सोमवार आणि मंगळवारी बैठक बोलावली आहे. या बैठकीत या खासदारांना राष्ट्रपतीपद निवडणुक प्रक्रियेची माहिती देण्यात येईल. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडीत प्रस्तावक आणि अनुमोदक यांच्यात आमदारांचाही समावेश असतो. त्यामुळे २० तारखेच्या बैठकीला भाजपचे आमदारही उपस्थित असतील. या संदर्भातील सगळ्या प्रक्रिया २० जूनला पार पडण्याची शक्यता आहे. भाजपकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार २३ जूनला अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ जूनला अमेरिकेला रवाना होण्याआधी ही सगळी प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचं बोललं जातं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




