नगर – सध्या प्रवेश प्रक्रीयेची धावपळ विद्यार्थ्याची चालु आहे या वर्दळीमध्यें सेतु कार्यालयामध्ये विद्यार्थ्याची मोठी लुट होताना निदर्शनास आले आहे विद्यार्थ्याना विविध प्रकारच्या प्रवेशा साठी दाखल्यांची गरज असते हे दाखले वेळेत मिळावेत अशी अपेक्षा असते मात्र दाखले वेळेत मिळत नाहीत. विद्यार्थी कडुन चिरीमिरी घेतल्या शिवाय काम होत नाही सावेडी येथील सेतु कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात एजंटचा सुळसुळाट आहे ,यामध्ये काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सुध्दा एजंटचे काम करत असल्याचे निदर्शनात आले आहे. लवकर दाखले मिळावेत म्हणुन विद्यार्थ्याकडुन अव्वाच्यासव्वा दरात पैसे आकारले जातात तहसीलदारांचे यावर काहीच नियंत्रण नाही कोणाला प्रशासनाची भितीच नाही याचे कारण नेमके काय ?असा सवाल करत मनविसेने याबाबत तहसिलदार कचेरीला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.
.जिल्ह्यातुन विद्यार्थी े विविध महाविद्यालयात प्रवेशासाठी येतातमात्र त्यंची लुट होतांना दिसत असल्याने गेल्या वर्षी याच विषयावर आदोंलन करण्यात आले पण तात्पुरत्या स्वरूपात हे सर्व थाबले आता पुन्हा जैसे थे परिस्थिती होते . प्रशासनाने आजपर्यत ठोस कारवाई याबाबत केली नसल्याने हे प्रकार वारंवार राजरोस पणे होतात सावेडी येथील तहसीलदार कार्यालया बाहेरील जो बाजार आहे याबाबत तर कोणाचेही लक्ष नाही सर्व प्रकारचे दाखले सेतु आणि तहसीलदार कडे असताना सुदधा बाहेर बाजार का मांडलेला असतो? पोलीस स्टेशन शेजारी तहसीलदार कार्यालय त्याठीकाणाहुन खोटे शिक्के जमा केले होते मात्र एकावरही कारवाई तर झाली नाहीच मात्र पुन्हा तेच प्रकार सुरू झाले आहेत .
खोटी कुपने, खोटे आधार कार्ड खोटे उत्पन्नाचे दाखले सर्रस पणे विकले जातात ज्याचा विविध कार्यकारी अधिकाऱ्याचा कार्यकाल संपुन अनेक वर्षे उलटुन गेली तरीही हा प्रकार काही बंद झाला नाही हे प्रकार न थांबल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तहसीलदार कार्यालयाला टाळे ठोकणारअसल्याचा ईशारा देतांनाच विशेष कार्यकारी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली आहे.





