👁 12 Views

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 22 जुलै रोजी

मुंबई, दि. 19 :  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदपुणे यांच्यामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा –2017 (MAHATET 2017) 22 जुलै 2017 रोजी घेण्यात येणार आहे.
इयत्ता पहिली ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते आठवी साठी सर्व व्यवस्थापनेसर्व मंडळेसर्व माध्यमेअनुदानितविना अनुदानितकायम विना अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक / शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत: ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असणार आहे. या परीक्षेसंबंधी सर्व शासन निर्णयअनुषंगिक माहितीसूचना तसेच ऑनलाईन अर्ज भरणेअर्ज स्वीकृतीपरीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mahatet.in  आणि www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा –2017 (MAHATET 2017) परीक्षेचा ऑनलाईन अर्ज आणि शुल्क भरण्याचा कालावधी 15 जून 2017  ते  30 जून 2017 असा आहे. प्रवेशपत्राची ऑनलाईन प्रिंट 10 जुलै 2017 ते 22 जुलै 2017 या कालावधीत काढता येईल. तर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर –I  ची वेळ 22 जुलै 2017 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1.00 अशी आहे. तर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर –II ची वेळ 22 जुलै 2017 रोजी दुपारी 2.00 ते 4.30 अशी असेल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव ढेरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *