👁 8 Views

धक्कादायक: मंगळवेढा तालुक्यातून मायलेकी बेपत्ता, पतीची पोलिसांत तक्रार

 

मंगळवेढा तालुक्यातील नंदूर येथून 30 वर्षीय विवाहित महिला व तीची 6 वर्षाची मुलगी अशा मायलेकी बेपत्ता झाल्या असून


प्रकरणी तीच्या पतीने पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.दरम्यान,त्या बेपत्ता महिलेचा पोलिस कसून शोध घेत आहेत.

दी.9 रोजी सकाळी 11.00 वा. यातील बेपत्ता विवाहिता ही तीच्या वहिनीला मंगळवेढा येथे दवाखान्याला घेवून गेली होती.


तीचे पती दुपारी 2.00 वा.पंढरपूर येथे गेले होते.पती रात्री 9.15 वा. घरी आले.तेव्हा घरामध्ये पत्नी व 6 वर्षीय मुलगी दिसली नाही.

याबाबत मुलाकडे चौकशी केली असता मम्मी रात्री 8.00 वा.घरातून मला काही न बोलता निघून गेल्याचे सांगितले. तदनंतर कुटुंबियांनी गावात व पै पाहुण्याकडे सर्वत्र शोध घेतला.


मात्र ती मिळून आली नाही.तीचे वर्णन -उंची 5 फुट 5 इंच,रंग काळा सावळा,अंगाने सडपातळ,अंगात मोरपंखी साडी व हिरवा ब्लाऊज,सोबत 6 वर्षाची मुलगी असून तीचे अंगात लाल रंगाचा टॉप व पँट,उंची 3 फुट,रंग गोरा,

अंगाने सडपातळ अशा वर्णनाच्या दोघी कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी मंगळवेढा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *