👁 6 Views

२० वर्षांनी युवकाने घेतला आईच्या हत्येचा बदला, मारेकऱ्याला घरात घुसून ठार मारला

 

रोहतक – हरियाणाच्या रोहतक इथं मुलाने आईच्या हत्येचा बदला घेत गुन्हेगाराला ठार केले आहे. २० वर्षापूर्वी या युवकाच्या आईची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी मुलाचे वय अडीच वर्ष होते.


महिलेची ३ जणांनी मिळून केली होती. त्यातील २ जणांचा आधीच मृत्यू झाला होता तर तिसरा व्यक्ती ज्याचे वय ६५ वर्ष होते ज्याची या युवकाने हत्या केली आहे.


रोहतक जिल्ह्यातील घिरोठी गावांत शुक्रवारच्या मध्यरात्री ६५ वर्षीय सुरजीत नावाच्या व्यक्तीची डोक्यात लोखंडी रॉड घालून हत्या करण्यात आली. पोलीस तपासात अधिकाऱ्यांनी घटनास्थळी लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यात एक युवक रात्रीच्यावेळी मृत व्यक्तीच्या घराच्या दिशेने जाताना दिसत होता. सुरजीतच्या कुटुंबानेही सुनीलला पाहिलं होते. त्यानंतर पोलिसांनी सुनीलला ताब्यात घेतले. त्याला खाकीचा हिसका दाखवताच सुनीलने हत्येचा गुन्हा कबूल केला. त्याचसोबत सुनीलने सुरजीतच्या हत्येचे कारणही पोलिसांना सांगितले.

आईच्या हत्येचा घेतला बदला
पोलीस जबाबात सुनील म्हणाला की, २० वर्षापूर्वी माझ्या आईची ३ जणांनी मिळून हत्या केली होती. त्यात सुरजीतचा समावेश होता. गावातील अनेकजण तुझ्या आईचे मारेकरी जिवंत आहेत आणि तू काहीच करू शकत नाही असं उकसवत होते. हत्येत सहभागी असलेल्या दोघांचा आधीच मृत्यू झाला होता. केवळ सुरजीत जिवंत होता. रोज रोज भेटणाऱ्या लोकांकडून टोमणे ऐकून मी वैतागलो त्यातून सुरजीतच्या हत्येचा प्लॅन आखला. सुरजीत म्हशीच्या तबेल्यात झोपला होता. तेव्हा लोखंडी रॉड डोक्यात घालून त्याची हत्या केली असं आरोपी युवकाने तपासात उघड केले.


या प्रकरणी पोलीस अधिकारी रणवीर सिंह म्हणाले की, वृद्धाच्या हत्येआरोपात आरोपीला अटक करण्यात आली आहे. तपासात त्याने आईच्या हत्येचा बदला घेण्यासाठी वृद्धाला मारल्याचं कबूल केले. आरोपी सुनीलला कोर्टासमोर हजर केल्यानंतर रिमांडवर घेण्यात आले आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेला रॉड पोलिसांनी जप्त केला आहे. तर या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *