👁 10 Views

विशेष पोलीस महानिरीक्षक (IG) मा. विश्वास नांगरे पाटील यांचेशी पंढरपूर Live चे मुख्य संपादक भगवान वानखेडे यांनी साधला संवाद…

पंढरपूर Live 23 जुन २०१७

आज येथील सिंहगड इंजिनिअरींग महाविद्यालयात कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक मा. विश्वास नांगरे पाटील (आय.जी.)  यांनी आषाढी यात्रेसंदर्भातील सुरक्षा, वाहतुक नियोजन वगैरे संदर्भात विविध प्रशासकीय अधिकारी, नगराध्यक्षा, पंढरीतील नागरिक, समाजसेवक, पत्रकार, नगरसेवक यांचेशी चर्चा केली.

यावेळी पंढरपूर Live चे मुख्य संपादक भगवान वानखेडे यांनीही त्यांचेशी संवाद साधून पंढरपूरच्या काही प्रमुख प्रश्नासंदर्भात चर्चा केली.
 पंढरपूर शहरातील बंद पडलेली सिग्नल यंत्रणा, पार्किंग प्रश्न व वाहतूक प्रश्न सोडवण्यासंदर्भात त्यांनी आपले म्हणणे मांडले. मा. विश्वास नांगरे पाटील यांनी याबाबत लवकरच उपाययोजना करू असे आश्वासन दिले.

यावेळी पोलीस अधिक्षक विरेश प्रभू, डी वाय एस पी निखिल पिंगळे, पो. उपअधीक्षक मिलिंद मोहिते, पंढरपूर शहर पो. ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, ता.पो. ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. के. खराडे, नगराध्यक्षा सौ. साधनाताई नागेश भोसले, आदींसह अनेक नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, सिंहगड कॉलेज चे प्राचार्य डॉ. कैलास करांडे, सचिव संजय नवले, सोमनाथ नवले आदी उपस्थित होते..

आषाढी यात्रा नियोजन संदर्भात येथील सिंहगड इंजिनिअरिंग  कॉलेज मध्ये आज मा. विश्वास नांगरे पाटील यांनी नागरिक, वारकरी प्रतिनिधी, नगरसेवक, पत्रकार यांच्याशी संवाद साधला.

या बैठकीनंतर पंढरपूर Live चे संपादक भगवान वानखेडे यांनी पुन्हा आयजीसो विश्वास नांगरे पाटलांची भेट घेतली व पंढरपूर Live चे कार्याबाबत माहिती दिली.










बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *