१) ऍक्युयोगा मधील १ ते १० क्रिया प्रथम कराव्या.
आकृतीत चेहऱ्यावरील ऍक्युप्रेशर बिंदू दाखविले आहेत.
प्रथम अनामिकेने (रिंग फिगर) करंगळी शेजारील बोटाने Extra -१ ह्या बिंदूवर गोलाकार मसाज १० ते ३० सेकंद करावा.
याचा फायदा म्हणजे हे भ्रूमध्य चक्र आहे. या बिंदूच्या पातळीत मेंदूमध्ये पियुषिका ग्रंथी (Pitutary Gland ) आहे. ह्यामुळे सर्व ग्रंथी व्यवस्थित काम करतात, यामुळे चक्कर, डोकेदुखी, सर्दी, मनोविकार ह्यावर फायदा होतो.
२) दोन्ही हाताच्या तर्जनीने UB -1 आणि माध्यमाने म्हणजेच मधल्या बोटाने (Middle Finger ) UB -2 ह्या बिंदूवर गोलाकार मसाज १० ते ३० सेकंद करावा. याचा फायदा डोळ्याचे आजार. चेहऱ्याचे लकवा इ. साठी होतो.
डॉ. साखरे एम.एस. M.D (Acuppuncture) D.A.C., F.I.A.C,.,N.D.DB.F.R
क्रमशः….
श्री स्वामी समर्थ एक्यूपंक्चर सेंटर 58,
पार्क स्टेडियम,
सोलापूर.मो.९८९०१९५०५९









