👁 10 Views

आजपासून श्री विठ्ठल दर्शन 24 तास

पंढरपूर : प्रतिनिधी
ज्या सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाकरिता शेकडो कि.मी. लांब चालून आलेल्या जास्तीत जास्त भाविकांना विठ्ठल दर्शन व्हावे याकरिता  मंदिर समितीने आजपासून ( दि.25 जून) 24 तास विठ्ठल दर्शन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 9 जुलैपर्यंत 24 तास दर्शन सुविधा चालू ठेवण्यात येणार असल्याचे मंदिर समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात येते. 
श्री विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरीकडे पायी चालत येत आहेत. श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेण्याची आस मनात ठेवून आलेल्या या भाविकांना विठ्ठल दर्शन सुलभतेने मिळावे याकरिता विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती प्रयत्नशील असते. त्याकरिता  विठ्ठलाच्या नित्योपचारामध्येही बदल करण्यात येत असतात. 
येत्या 4 जुलै रोजी आषाढी एकादशीचा सोहळा होत आहे. त्याकरिता राज्यभरातून पालखी सोहळे, दिंड्या आणि भाविक पायी चालत पंढरीकडे येत आहेत.यापैकी बहुतांश भाविक पंढरीत येऊन विठ्ठल दर्शन घेऊन परत पालखी सोहळ्यास सहभागी होत आहेत. त्यामुळे पंढरपूरात येणार्‍या भाविकांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. येणार्‍या भाविकांना तातडीने, सुलभ दर्शन व्हावे याकरिता मंदिर समितीने 25 जुनपासून ( रविवार) विठ्ठल मंदिर 24 तास दर्शनाकरिता खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 
त्यानुसार पहाटे 4.30 वाजता होणारी नित्यपूजा, सकाळी 11. 45 वाजताचा नैवेद्य आणि सायंकाळी 8.45 वाजता निंबूपाणी एवढेच नित्योपचार केले जाणार आहेत. या व्यतिरिक्‍त संपूर्ण दिवस आणि रात्रभर विठ्ठल दर्शन चालू राहणार आहे. विठ्ठल दर्शनाची वेळ 8 तासांनी वाढणार असल्यामुळे दर्शन रांगेत उभा राहिलेल्या भाविकांचा दर्शन वेळही वाचणार आहे.  दि. 9 जुलैपर्यंत ही दर्शन व्यवस्था राहणार आहे. त्याचबरोबर 1 ते 10 जुलै या दरम्यान ऑन लाईन बुकिंग दर्शनही पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे केवळ दर्शन रांगेतील भाविकांनाच या 10 दिवसात विठ्ठलाचे दर्शन मिळणार आहे. 
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *