👁 6 Views

गादेगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी आमदार आवताडे गटाच्या सौ लता राजेंद्र हुंडेकरी यांची बिनविरोध निवड


  पंढरपूर तालुक्यातील गादेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी  आमदार समाधान दादा आवताडे गटाच्या सौ लता राजेंद्र हुंडेकरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील  ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक अधिकारी पटेल  व अध्यक्ष म्हणून गादेगाव सरपंच सौ वंदना मोहन  बागल यांच्या उपस्थितीत १३/३/२०२३ रोजी पार पडली.


 ही निवडणूक बिनविरोध होऊन आवताडे गटाच्या सौ लता राजेंद्र हुंडेकरी यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली गादेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच पद सुद्धा आमदार आवताडे गटाकडे असल्याने सरपंच व उपसरपंच दोन्ही पदे आमदार आवताडे यांच्या गटाकडे असल्याने गावात विकास कामांना मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असल्याचे यावेळी उपस्थितातुन बोलले जात होते.या निवडीनंतर गावात फटाके फोडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.


        यावेळी मिस्टर सरपंच मोहन आप्पा बागल,आवताडे गटाचे नेते शांतिनाथ बागल,पद्माकर बागल,गणेश बागल,दत्ता बागल, अरूण भाऊ बागल,मोहन हुंडेकरी,गणपत मोरे,महादेव फाटे,विक्रम बागल,बाळासाहेब बागल,राजेंद्र हुंडेकरी,ग्रामपंचायत सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *