मुंबई – लालबागमध्ये दोरीने गळ्याला फास लावून तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.
प्रकरणी तरुणाच्या भावाने केलेल्या तक्रारीवरून काळाचौकी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात सोमवारी हत्येचा गुन्हा दाखल केला.19 वर्षीय मसूद मिया ऊर्फ मासूम मिया रमझान सरकार असे मृत तरुणाचे नाव आहे.
मसूद मियाचा भाऊ मुजाहिद सरकार याच्या तक्रारीवरून काळाचौकी पोलिसांनी याप्रकरणी सोमवारी सायंकाळी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
मसूद मिया याचा मृतदेह लालबाग परिसरातील एका इमारतीच्या 15 व्या मजल्यावरील फ्लॅटमध्येबसापडला. त्याला केईएम रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तरुणाचे हात-पाय बांधलेल्या अवस्थेत आढळल्यामुळे त्याला मारण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.



