👁 11 Views

आषाढी यात्रा उत्कृष्ठ वार्तांकनासाठी पुरस्कार 15 जुलै पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

पंढरपूर: प्रतिनिधी
श्रमीक पत्रकार संघाच्यावतीने यावर्षी आषाढी यात्रेच्या दरम्यान उत्कृष्ट वार्तांकन करणाऱ्या पंढरपूर शहर आणि तालु्नयातील पत्रकारांना सन्मानीत करण्यात येणार असून  वर्तमान पत्र, दुरचित्र वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि छायाचित्रकार यांनी 16 जून ते 9 जुलै या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचे प्रस्ताव 15 जुलै पर्यंत प्रस्ताव द्यावेत असे आवाहन पत्रकार संघाचे  अध्यक्ष मोहन डावरे यांनी केले आहे.
श्रमीक पत्रकार संघाच्यावतीने  गत वर्षीपासून आषाढी यात्रा काळात उत्कृष्ट वार्तांकन, उत्कृष्ट छायाचित्रण तसेच दुरचित्रवाहिन्यांच्या प्रतिनिधींनाही पुरस्कार देण्यात येत आहेत. यावर्षीच्या आषाढी यात्रेचा कालावधी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थानापासून ( 16 जुलै) ते पालख्यांच्या परतीच्या प्रवासापर्यंत ( दि.9 जुलै) असून या दरम्यान प्रकाशित बातम्या, छायाचित्रे आणि दुरचित्रवाहिन्यांवर प्रसारित बातम्यांचा विचार केला जाणार आहे.  प्रस्तावात सार्वजनिक समस्या, सुचना आणि यात्रेच्या अनुषांगिक परिणामकारक, सकारात्मक  बातम्यांचा समावेश अपेक्षीत असून अशाच प्रस्तावांचा पूरस्कारासाठी विचार केला जाईल. वातार्ंकनासाठी पंढरपूर शहर आणि  पंढरपूर ग्रामीण असे दोन विभागातून पूरस्कार देण्यात येतील.दुरचित्रवाहीनी तसेच छायाचित्रकारांसाठी स्वतंत्र पुरस्कार देण्यात येतील. वार्ताहरांनी आपल्या बातम्यांच्या कात्रणांसह तर   दुरचित्रवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी सी. डी. मध्ये प्रसारित बातम्यांच्या ्नलीप द्याव्यात. छायाचित्रकारांनी प्रकाशीत छायाचित्रांची वर्तमान पत्राची कात्रणे प्रस्तावासोबत द्यावीत. हे सर्व प्रस्ताव 15 जुलैपर्यंत विजयसिंह मोहिते-पाटील ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, लक्ष्मीपथ, संगम ज्वेलर्सच्या शेजारी या ठिकाणी पोहोच करावेत असेही आवाहन डावरे यांनी केले आहे
 बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *