विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व
श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीच्या वतीने
आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला ज्ञानपंढरीच्या भक्त पुंडलिक घाटावर
॥ ‘पवित्र चंद्रभागे’ची आरती ॥
नामवंत कृषीतज्ञ डॉ. आर. बी. ठाकरे यांच्या शुभहस्ते…
(सोमवार, दि. ३ जुलै २०१७ रोजी सायं. ७.१५ वा.)
पुणे ः विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती व विश्वशांती गुरुकुल, वाखरी, पंढरपूरच्या वतीने आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच दशमी – मंगळवार, दि. ३ जुलै २०१७ रोजी सायं. ७.१५ वा. भक्त पुंडलिक घाटावर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कृषीतज्ञ, तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ डॉ. रमेश बी. ठाकरे, नागपूर व नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एस.एन. पठाण यांच्या शुभहस्ते पवित्र चंद्रभागेची आरती संपन्न होणार आहे.
या चंद्रभागेच्या आरती सोहळ्यामध्ये पंढरपूरचे आदरणीय मा. श्री. सुधाकरपंत परिचारक, पंढरपूर देवस्थानचे माजी विश्वस्त मा. श्री. वा. ना. उत्पात, दै. पंढरी संचार संपादक मा. श्री. बाळासाहेब बडवे, पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा मा. सौ. साधना भोसले, हाडाचे वारकरी ह.भ.प. श्री. तुळशीराम दा. कराड हे विशेष अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. तसेच, वारकरी संप्रदायातील अनेक आदरणीय कीर्तनकार, प्रवचनकार, दिंडीप्रमुख, फडकरी, मानकरी हे देखील ‘नमामि चंद्रभागे’च्या या प्रदूषण नियंत्रण व स्वच्छता अभियानाच्या ऐतिहासिक अशा चंद्रभागेच्या आरती सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत.
विदर्भ भूषण, कृषी भूषण असे विविध पुरस्कारप्राप्त मानवतावादी डॉ. रमेश बी. ठाकरे हे जागतिक कीर्तीचे कृषीतज्ज्ञ असून, थोर विद्वान, शिक्षणतज्ज्ञ, जाणकार समाजकारणी म्हणून सर्वांना परिचित आहेत.
‘नमामि चंद्रभागेच्या’ उपक्रमांतर्गत होणार्या या ऐतिहासिक स्वरूपाच्या चंद्रभागेच्या आरती सोहळ्यात समस्त वारकरी भाविकभक्तांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड, विश्व शांती गुरुकुल, वाखरी, पंढरपूरच्या संचालिका प्रा. स्वाती कराड-चाटे आणि सांगोला येथील मानवतावादी, थोर सामाजिक कार्यकर्ते श्री. श्रीकांतजी देशमुख यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




