👁 9 Views

यात्रा कालावधीत व्यवसायिकांकडून भाविकांची लूट…


आषाढी यात्रेसाठी लाखो वैष्णवांचा मेळा पंढरीत दाखल झालाय . सावळ्या विठुच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची लुट मात्र काहि केल्या थांबताना दिसत नाही . शौचास लागणाऱ्या पाण्यापासून ते सामान ठेवण्यासाठी लागणाऱ्या जागेला पैसे घेतले जातात . लहान मोठी हॉटेल, दुकाने इत्यादी ठिकाणी जास्त किंमत घेऊन वस्तू विक्री होत आहे. खऱ्या भक्तांबरोबरच हौशे , नवशे सुध्दा या लुटीतुन सुटत नाहित . सध्या पंढरपूरात गुटख्याची अव्वाच्या सव्व दराने विक्री सुरुये . उचे लोक उची पसंद चा गुटखा चाळीस रुपयांवर पोहचलाय . तर स्टार , विमल , जय हो सारख्या गुटख्याची विक्री देखिल चढ्या दराने सुरुये . शहरात सर्वच पान टपऱ्यामध्ये गुटखा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे . दर्शन रांग , दिंडीमध्ये तसेच दर्शन मंडपात देखिल गुटखा सहज उपलब्ध होतो. आवक नसल्याचे कारण देत भाविकांची लुट होताना दिसत आहे . अन्न औषध प्रशासन , पोलीस प्रशासन ग्राहकांच्या दिवसाढवळ्या होणाऱ्या लुटीकडे डोळे झाक करत आहेत . टॅक्स घेण्यापुरतेच प्रशासन गुटख्याकडे लक्ष देत आहे . शेजारील कर्नाटक राज्यातुन हा माला आयात केला जातो . दोन राज्यातील टॅक्स भरावा लागत असल्याने ही भाव वाढ होत असल्याची चर्चा ग्राहकांमध्ये  आहे. प्रशासनाने तात्काळ यावर तोडगा काढावा अन्यथा आषाढी यात्रेच्या महापुजेला आलेल्या मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याची तयारी गुट्खा ग्राहकानीं केल्याचे समजते 

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111



Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *