15) कपाळावर बाजूला केसांच्या रेषेत आत 1 बोट अंतरावर St 8 हा बिंदू आहे. त्यावर दोन्ही बाजूस तर्जनीने गोलाकार मसाज करावा, त्या मुळे आर्धशिशी, डोळे दुखणे, डोळ्यात पाणी येणे इ. साठी उपयोग होतो. तसेच कपाळावरील सुरकुत्या कमी होतात.
16) दोन्ही हाताच्या तर्जनीने दोन्ही बाजूस गालाच्या हाडाखाली डोळ्याच्या बाहेरील कडेखाली SI 18 बिंदू आहे. त्यावर गोलाकार मसाज करावा. 10 ते 30 सेकंद याचा उपयोग चेहऱ्याचा लकवा, दात दुखणे, चेहरा दुखणे यासाठी होतो.
तसेच गालावरची सुरकुत्या कमी होतात.
17) डाव्या हाताच्या तर्जनीने आणि अंगठ्याने गळ्यावरील स्नायूच्या आतील बाजूस St9, St10 याचा फायदा घसा दुखणे, दमा, उच्च रक्तदाब, मुकेपणा इ. साठी आहे










