👁 10 Views

महिलांना शिलाई मशिन वाटप व महिला मेळावा

पंढरपूर ः दि.02- रविवार दि.02 जुलै, 2017 रोजी मौजे सरकोली, ता.पंढरपूर येथे 14 वा वित्त आयोग सन 2016-17 अंतर्गत महिला व बालकल्याण निधी मधून 19 महिलांना शिलाई मशिनचे वाटप आणि अंगणवाडींना लोखंडी कपाट, कॉम्प्युटर टेबल व धान्य कोठी यांचे वाटप मा.डॉ.सौ.प्रणिताताई भगिरथ भालके यांचे अध्यक्षतेखाली व मा.सौ.जयश्रीताई भारत भालके, सौ.माधुरी कुंडलिक बेदरे, माजी जि.प.सदस्या सौ.शोभा मोहन भोसले यांचे शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी मौजे सरकोली ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांना शिलाई मशिन वाटप व महिला मेळावा निमित्त कार्यक्रमावेळी अध्यक्षीय भाषण करतांना सौ.डॉ.प्रणिताताई भालके म्हणाल्या की, चुल आणि मुल यातून वेळ काढून उद्योग व्यवसाय करावा, गांवामध्ये बचतगट तयार करून त्या माध्यमातून नव-नवीन उद्योग-व्यवसाय सुरू केल्यास आपल्या गांवाचीही मोठी बाजारपेठ म्हणून ओळख निर्माण होईल. तसेच महिलांनी आरोग्याकडे लक्ष देऊन मुलांना चांगले शिक्षण व संस्कार देणे सध्या अत्यंत गरजेचे आहे. आपल्या गांवातील अशिक्षित ज्येष्ठ नागरिकांना शिक्षित करण्यात भर द्यावा. सर्व महिलांनी संघटीत होऊन सरकोली गावाचा कायापालट करावा हे सर्व करीत असतांना काही अडी-अडचणी आल्यास केंव्हाही मी आपणांस मदत करणेस तयार आहे असेही त्यंानी सांगितले.

सदर कार्यक्रमाचे प्रस्तावित सौ.प्रतिभा पांडुरंग भोसले, सरपंच ग्रामपंचायत सरकोली यांनी केले. 

यावेळी माजी सरपंच सौ.अंजली भास्कर भोसले, मोहन बापू भोसले, पांडुरंग उध्दव भोसले, भास्कर भोसले, सौ.सिताबाई उत्तम माळी, सौ.राणी हरिदास भोसले, सौ.सुनिता सुरेश पोपळे, सौ.लक्ष्मी भास्कर भोसले, सौ.राधा सुग्रीव एकमल्ली, सौ.सिंधुबाई सिध्देश्‍वर भोसले, नागनाथ जगताप, प्रविण भोसले, तुळशिराम भुई, गौतम एकमल्ली, दत्तात्रय भुई ग्रा.पं.सदस्या व सदस्य आणि गांवातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.

शेवटी ग्रामसेवक ए.ए.मुढे यांनी सर्वांचे आभार मानले.


सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा


  











सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 

पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *