👁 9 Views

‘शक्तीमान’मधील खलनायक डॉ. जैकाल पाहा आता काय करतात…

मुंबई : ९०च्या दशकात टीव्हीवर एक अशी मालिका टीव्हीवर दाखवली जायची जी लहानांपासून मोठ्यांनाही पसंत होती. ती म्हणजे शक्तीमान. शक्तीमान भारतातील पहिला सुपरहिरोही मानला जातो. या मालिकेचे तब्बल ५२० एपिसोड झाले होते. त्यावेळी या मालिकेचा टीआरपी इतका होता की सध्याचे टीव्ही सीरियल्स याची बरोबरीच करु शकत नाहीत. 
या मालिकेत लोकांचा सुपरहिरो असलेल्या शक्तीमानाला अनेक खलनायक खूप त्रास द्यायचे. यातील एक मुख्य खलनायक म्हणजे डॉ. जैकाल. आज इतक्या वर्षानंतरही शक्तीमान मालिकेतील सर्वच पात्रे लोकांच्या लक्षात आहेत. 
शक्तीमानमधील तमराज किलविशनंतर सगळ्यात मोठा खलनायक डॉ. जैकाल. ललित परिमू यांनी ही भूमिका साकारली होती. 
१९९७मध्ये शक्तीमान सुरु झाल्यानंतर ललित यांचे नशीबच बदलले. त्यानंतर अनेक सिनेमांमध्ये त्यांनी काम केले. हजार चौरासी की मां, हम तुम पर मरते हैं, एजेंट विनोद आणि २०१३ मध्ये आलेली हैदर. हैदर या सिनेमात त्यांनी शेवटचे काम केले. 
ललित परिमू यांनी ‘मैं मनुष्य हूं’या नावाचे पुस्तकही लिहिले. थिएटर तसेच  १००हून अधिक टीव्ही सीरियल्समध्ये काम करणारे ललित परिमू सध्या अॅक्टिंग अॅकॅडमी चालवतात. 

  



















सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 

पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *