अहमदनगर : कोपर्डी खटल्याच्या सुनावणीत आरोपी संतोष भवाळचे वकील बाळासाहेब खोपडे यांचा अर्ज अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. खोपडे यांनी बचाव पक्षाच्या साक्षीदारांच्या यादीत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यासह सहा जणांची नावं दिली होती.
बचाव पक्षाच्या साक्षीदारांच्या यादीत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची साक्षही घ्यावी, अशी मागणी करणारा अर्ज वकील बाळासाहेब खोपडे यांनी केला होता. तो अर्ज अर्ज अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या या आदेशावर आम्ही हायकोर्टात अर्ज करणार असल्याचे वकिलांनी सांगितले. त्यावर कोर्टाने 24 जुलैपर्यंतची मुदत दिली असून, येत्या 24 तारखेला याबाबत हायकोर्टात केलेल्या अपीलाची काय स्थिती आहे, हे म्हणणं मांडण्याची मुदत दिली आहे.
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा











