कोपर्डी हत्याकांडाच्या त्या तरुणीसाठी मराठा क्रांती मोर्चा तर्फे १३ जुलैला अकोल्यात कॅण्डल मार्च काढण्यात येणार आहे. १३ जुलैचा तो काळा दिवस ज्या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरला याचा परिणाम म्हणून लाखो लोक सदभावनेने रस्त्यावर उतरले, पण त्या मुलीला अजुनही न्याय आणि दोषींना शिक्षा होऊ शकली नाही. कोपर्डी नंतर अशा घटना वाढत राहिल्या पण सरकारच्या डोळ्यावरची झापड काही केल्या उघडेना. १३ जुलैला कोपर्डीच्या भगीनीला मुंबई, कोपर्डी सह संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी कॅण्डल मार्चचे आयोजन करुन श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने अकोल्यात सुद्धा कॅण्डल मार्च आयोजित करण्याचा निर्णय सकल मराठा समाज अकोला जिल्हा समन्वयकांच्या बैठकीत घेण्यात आला.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर कर्जत येथे बलात्कार करून तिची निर्घुणपणे हत्या करण्यात
आली होती. त्यामुळे दिल्लीतील निर्भया हत्याकांडाची पुनरावृत्ती पुन्हा एकदा महाराष्ट्रात सुद्धा पाहायला मिळाली होती. याच क्रूर हत्याकांडाचा निषेध म्हणून आता एक वर्ष पूर्ण झाल्याने पण अजूनही आरोपींवर कठोर कारवाई न झाल्यामुळे मराठा समाजातर्फे हा कॅण्डल मार्च काढण्यात येणार आहे. अकोल्याच्या महाराणा प्रताप बागेत हा मार्च पोहचल्या नंतर त्या ठिकाणी या भगिनीला सामूहिक श्रद्धांजली देण्यात येणार आहे.

अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा