👁 10 Views

मित्रासोबत बेडवर रंगेहाथ पकडल्यानंतर पत्नीचा बलात्काराचा आरोप


मित्रासोबत बेडवर रंगेहाथ पकडल्यानंतर पत्नीचा बलात्काराचा आरोप

12 Jul. 2017
मुंबई, दि. 12 – पतीने मित्रासोबत बेडवर रंगेहाथ पकडल्यानंतर पत्नीने आपल्यावर बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे. ज्या मित्रासोबत पतीने रंगेहाथ पकडलं त्याच मित्रावर महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी शेजा-यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. आरोपी तक्रारदार महिलेचा मित्र असून तो अनेकदा तिच्या घरी येत असे अशी माहिती शेजा-यांनी दिली आहे. आरोपी तरुण सध्या फरार आहे.

महिलेचा पती काही कामानिमित्त रात्री बाहेर गेला होता. मात्र आणप काहीतरी विसरलो असल्याचं त्याला अचानक आठवलं, आणि त्यासाठी तो पुन्हा घरी आला. घरी पोहोचला असता आपल्या रुममध्ये कोणीतरी अनोळखी व्यक्ती असल्याचं त्याच्या लक्षात आलं. आपण अडचणीत सापडणार असं लक्षात येताच महिलेने आपल्यावर बलात्कार होत असल्याची आरडाओरड करायला सुरुवात केली. यानंतर महिलेच्या पतीने त्याला पकडलं आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. मित्राने आपले कपडे गोळा केले आणि तिथून तसाच पळ काढला.

महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे. माझे सासू-सासरे झोपले होते, पतीसाठी दरवाजात उघडा ठेवला असताना ही अनोळखी व्यक्ती घरात शिरली असा दावा महिलेने तक्रारीत केला आहे. महिलेचा भाऊ आणि वहिनी उत्तर प्रदेशला गेले असल्याने महिला घऱी एकटीच होती. ‘महिलेने केलेल्या तक्रारीच्या आधारे आम्ही 376 कलमांतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे’, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

  












































सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *