👁 10 Views

उद्या पंढरपूरकर कोपर्डीतील निर्भयाला अर्पण करणार भावपूर्ण श्रध्दांजली…!

उद्या पंढरपूरकर कोपर्डीतील निर्भयाला अर्पण करणार भावपूर्ण श्रध्दांजली…!
पंढरपूर Live बातमी
दिनांक : 13 जुलै 2017 गुरुवार रोजी सायं 6 वाजता छत्रपती शिवाजी चौक पंढरपूर येथे  

 कोपर्डीतील निर्भयाला सकल समस्त पंढरपूरकर  श्रद्धांजली अर्पण  आहेत.

आईची लाडकी आणि वडिलांची लाडकी राजकन्या असणारी कोपर्डीतील कोवळ्या निर्भयावर काही नराधमांनी अमानुष- अमानवी अत्याचार करून बलात्कारानंतर तिची निर्घूण हत्या करण्यात आलेल्या घटनेला तब्बल एक वर्ष पुर्ण झाले.  पंढरपूर शहर व तालुक्यातील तमाम सर्व जातीधर्मातील बंधु – भगीनीच्या वतीने येत्या गुरुवार दि 13 जुलै 2017 रोजी सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी चौक,पंढरपूर येथे कोपर्डीच्या निर्भया कन्येला भावपूर्ण श्रद्धांजलि.अर्पित करण्यात येणार आहे .

पुरोगामी म्हणून मिरवणार्या महाराष्ट्रात आजही आपल्या मुली ,माता – भगीनी सुरक्षित नसून राज्याच्या विविध भागात मुली व महिलांवर होणार्या अन्याय – अत्याचारात दैनंदिन वाढच होत आहे , त्या कोवळ्या निर्भया कन्येच्या बलिदानाला व्यर्थ न जाऊ देण्यासाठी आणि समाजातील सर्व मुली , माता – भगीनी सुरक्षित राहाव्यात यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातुन लाखोनी निघालेले शिस्तबध्द , मुक मोर्चाने संपूर्ण देशाला हेवा वाटला , एक एेतिहासीक आदर्श घालून देत अन्याय अत्याचार विरुध्द शांततेत लढा उभारता येऊ शकतो हे जगाला दाखवुन दिले .
तरी स्री शक्तीचा सन्मान व संरक्षण करण्याची शपथ घेण्यासाठी सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे अशी विनंती सकल मराठा समाज व संभाजी ब्रिगेड चे वतीने तसेच आयोजकांचे वतीने  सर्वांना केली आहे.🙏🏼

 
 
  












































सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *