👁 7 Views

१४ जुलैला रंगणार ‘लपाछपी’ चा भयानक खेळ

अनिल चौधरी, पुणे:-

मराठी तरुणांच्या हृदयाचा ठोका चुकवणारी ग्लॅम अभिनेत्री पूजा सावंत चक्क प्रेग्नंट असल्याची बातमी वा-यासारखी पसरली, आणि पूजाच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसला. सोशल नेट्वर्किंग साईटवर पब्लिश झालेल्या पूजाच्या ८ महिन्याच्या बेबी बंप फोटोजमुळे चर्चेला सुरुवात झाली होती. मात्र, आगामी ‘लपाछपी’या सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यानचा तिचा हा नवा लुक असल्याचे समोर आले, आणि या चर्चेला पूर्णविराम मिळाला. 
‘लपाछपी’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉंच करण्यात आला असून, ह्या ट्रेलरला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाचा ट्रेलर पाहताना ‘लपाछपी’ सिनेमातील हॉररची कल्पना येते. अभिनेत्री पूजा सावंत या ट्रेलरमध्ये एका नव्या रूपातच लोकांसमोर येत असल्यामुळे, तिच्या चाहत्यांना देखील तो आच्छर्याचा धक्का ठरत आहे. यात ती ८ महिन्याची गरोदर महिला असून, आपल्या बाळाला वाचवण्यासाठी तिची धडपड या ट्रेलरमध्ये दिसून येते. विशेष म्हणजे हा ट्रेलर अधिक हॉरर करण्यासाठी एक्स्ट्रा साऊंड इफेक्टचा वापर करण्यात आल्यामुळे, ट्रेलर पाहणाऱ्यांचा थरकाप उठल्याशिवाय राहत नाही. 

एव्हढेच नव्हे तर, रेखा भारद्वाज यांनी गायलेले ‘लपाछपी’ सिनेमातील बालगीत देखील रसिकांच्या अंगावर काटा उभा करून जातो. ‘एकच खेळ लपाछपीचा…’ असे बोल असणारे हे गाणे या सिनेमाच्या ‘भीती’ ला योग्य न्याय देतं. सिनेमातील या गाण्याच्या नंदिनी बोरकर मूळ गायिका असून, स्वयेश्री शसीन वर्धावे यांनी हे बालगीत लिहिले आहे. शिवाय रंजन पटनाईक, टॉनी बसुमातरी आणि उत्कर्ष धोटेकर या तिघांनी गाण्याचे संगीतदिग्दर्शन केले आहे. 
या सिनेमाची कथा दिग्दर्शक विशाल फुरिया आणि विशाल कपूर यांनी लिहिली आहे. ‘लपाछपी’ हा सिनेमा मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट भयपट ठरण्याची शक्यता असल्याचा अंदाज, सिनेमाचा ट्रेलर पाहताना होतो. वाईल्ड एलीफंट मोशन पिक्चर्स  प्रायव्हेट लिमिटेडच्या अरुणा भट आणि सुर्यवीरसिंग भुल्लर प्रस्तूत मिडास टच मुव्हीजचे जितेंद्र पाटील व मीना पाटील निर्मित आणि मुसिक फिल्म्सचे रणजीत रामप्रकाश यांची सहनिर्मिती या सिनेमाला लाभली आहे. 
अभिनेत्री पूजा सावंतवर आधारित असलेल्या या सिनेमाची अंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी कौतुकास्पद आहे. नुकत्याच लंडन येथे झालेल्या लंडन इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये या सिनेमाला प्रीमियरसाठी विशेष निमंत्रण मिळाले होते. लंडन फिल्म फेस्टिवलमध्ये प्रदर्शित होण्यापूर्वी या सिनेमाने अनेक आंतरराष्ट्रीयफिल्म फेस्टिवल्समध्येदेखील आपले नशीब आजमावले आहे. ज्यात विविध आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकूण १५ पुरस्कारांवर या सिनेमाने बाजी मारली असून, हडसन,ओहायो येथील इंटरनेशनल हॉरर हॉटेलचा पुरस्कार देखील ‘लपाछपी’ या चित्रपटाने आपल्या नावे केला आहे. शिवाय  २०१६ साली माद्रिद येथे झालेल्या माद्रिद इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल्समध्ये या चित्रपटाला पाच नामांकने देण्यात आली होती. ज्यात पूजाची  सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत निवड करण्यात आली होती. त्याचप्रमाणे गतवर्षीच्या ब्रुकलीन फिल्म फेस्टिवल्समध्ये या चित्रपटाला स्पिरीट अवार्डने सन्मानित करण्यात आले होते. विशेष म्हणजे भारतातील हाॕरर सिनेमाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर या सिनेमाने एक नवा आयाम मांडला आहे. हॉरर कथानकावर आधारित असलेल्या ह्या मराठी सिनेमाची दर्जेदार मेजवानी येत्या १४ जुलै रोजी महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना चाखायला मिळणार आहे 

  














































सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *