👁 10 Views

विक्रम शिरसट मित्र मंडळ करणार चंद्रभागेच्या पात्राची स्वच्छता * सर्वच सामाजिक संघटनांचा सहभाग गरजेचा *

विक्रम शिरसट मित्र मंडळ करणार चंद्रभागेच्या पात्राची स्वच्छता
* सर्वच सामाजिक संघटनांचा सहभाग गरजेचा *
नुकत्याच पार पडलेल्या आषाढी यात्रेनंतर चंद्रभागेच्या वाळवंटात तसेच पात्रातही प्रचंड घाण झालेली दिसून आली.जिल्ह्यातील विविध शासकिय कर्मचार्‍यांनी एकत्र येत नुकतीच वाळवंटाची साफसफाई केली आहे.मात्र चंद्रभागेच्या पात्रात मोठया प्रमाणात शेवाळं वाढलेले आहे.तसेच विविध वस्तु,कपडे,कुजलेले खाद्य पदार्थ यामुळे या पाण्यास मोठी दुर्गंधी सुटली आहे.सद्या चार्तुमासानिमित्त मोठया प्रमाणात भविक पंढरीत वास्तव्यास असून रोज चंद्रभागेच्या स्नानास गर्दी करत आहेत.त्यामुळे विक्रम शिरसट मित्रमंडळाने चंद्रभागेच्या नदीपात्रातील घाण स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला असून सोमवारी शेकडो कार्यकर्ते पात्रात स्वच्छता करणार आहेत व जेसीबी व वाहनांनद्वारे येथील कचरा हटविणार आहेत.तरी या अभियानात सर्वच सामाजिक संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहन नगरसेवक विक्रम शिरसट यांनी केले आहे.
                 विष्णूपद बंधार्‍यामुळे भाविकांना स्नानासाठी पाणी उपलब्ध होत असले तरी पाण्याचा प्रवाह थांबलेलाच रहात असल्यामुळे चंद्रभागेच्या पात्रातील पाण्यात पाणगवत तसेच शेवाळ मोठया प्रमाणात निर्माण होत आहे.त्यामुळे अनेकवेळा भाविक पाय घसरुन पडत असल्याचेही दिसते.तर पाण्यासही दुर्गधी येत आहे.तसेच भाविकांनी पात्रात टाकून दिलेल्या विविध वस्तू,जुने कपडे हे येथेच पाण्यात कुजत आहेत.त्या मुळे पवित्र चंद्रभागेचे पाणी अतिशय उर्ग दर्प मारत आहे.त्यामुळे विक्रम शिरसट मित्र मंडळाने हाती घेतलेला हा उपक्रम निश्‍चितच कौतुकास्पद असून यामध्ये शहरातील सर्वच संघटनांनी सहभाग घेतल्यास चंद्रभागेची साफसफाई पुर्ण होणार आहे.

जा
  














































सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *