👁 11 Views

सोलापूरातील टॉवेल व्यापार्‍याला 15 लाखांचा गंडा..!

सोलापूर दि २१ : येथील टॉवेल व्यापारी जालंधर सिद्राम चन्ना (वय ४५,रा.भवानी पेठ) यांचे १५ लाख ४ हजार रुपयांचे टॉवेल घेऊन तामिळनाडू व मुंबईच्या व्यापाऱ्यांनी पैसे न देता त्यांची फसवणुक केली. यासंदर्भात चन्ना यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात शुक्रवारी फिर्याद दिल्यानंतर आठ महिन्यानंतर फसवणुकीचे हे प्रकरण उघडकीस आले.

या प्रकरणी रघु पांडीत शेट्टी (रा.कोटुर,ता.बरगुर.जि.कृष्णगीरी, राज्य तामिळनाडूू),अरविंद नारायण (रा.काळबा देवी रोड मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत. आरोपीने फिर्यादीच्या कारखान्यातुन तसेच त्यांच्या सासरे व इतर व्यापाऱ्या कडून वेळोवेळी टॉवेलची खरेदी केली. त्याची रक्कम न देता धनादेश देवुन अमिष दाखवले. गेल्या आठ महिन्यांपासून फिर्यादीस पैसे देण्यास टाळटाळ करीत होते. आरोपीने १५ लाख ४ हजार ७२२ रुपयांचे टॉवेल विकत घेवुन त्यांची फसवणुक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्या दोन व्यापाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा अधिक तपास सपोनि शेख करत आहेत.

जाहिरात 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




  
















Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *