👁 7 Views

विधानपरिषद कामकाज : ‘वंदेमातरम’ने विधानपरिषद कामकाजास प्रारंभ

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. ! 

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

                  सुधारीत विधानपरिषद कामकाज :

वंदेमातरमने विधानपरिषद कामकाजास प्रारंभ

मुंबई, दि. 24 : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आज दि. २४ जुलै रोजीवंदेमातरमने प्रारंभ झाला.
यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकरमहसूल मंत्री चंद्रकांत पाटील,संसदीय कार्य मंत्री गिरीष बापटपरिवहन मंत्री दिवाकर रावतेगृह राज्यमंत्री रणजित पाटील,ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेपदुम राज्यमंत्री अर्जुन खोतकरराज्य उत्पादनशुल्क राज्यमंत्री दिलीप कांबळे,कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत आदी राज्य मंत्रीमंडळातील सदस्यांसह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धंनजय मुंडेनारायण राणेसुनील तटकरेशरद रणपिसेजयंत पाटील व इतर विधानपरिषदेचे सदस्य उपस्थित होते.
००००
विधानपरिषद तालिका सभापतींची नावे जाहीर
मुंबईदि. 24 : आजपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनासाठी विधान परिषदेच्या तालिका सभापतींची नावे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी जाहीर केली.
सदस्य डॉ.नीलम गोऱ्हेसदस्य सर्वश्री जनार्दन चांदूरकरडॉ. अपूर्व हिरेकिरण पावसकर यांची नावे तालिका सभापती म्हणून जाहीर करण्यात आली आहे.
०००००
विधानपरिषदेत दिवंगत सदस्यांना शोक प्रस्तावाद्वारे आदराजंली
मुंबईदि. 24 : माजी विधानपरिषद सदस्य शिवाजीराव गिरीधर पाटीलभिकू दाजी भिलारे (गुरुजी)बाबुराव आबासाहेब धारवाडे या विधानपरिषदेच्या दिवंगत सदस्यांना आज विधानपरिषदेत शोकप्रस्तावाद्वारे आदरांजली अर्पण करण्यात आली.
राज्यविधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत  शोकप्रस्ताव मांडला. शिवाजीराव पाटील यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सक्रीय सहभाग घेतला होता. तसेच अनेक सामाजिकसहकारी संस्थामध्ये विविध पदांवर उत्कृष्ट काम केले. भिकू दाजी भिलारे यांच्या कार्याबद्दल बोलताना महसूल मंत्री श्री. पाटील म्हणाले, समाजात त्यांची अभ्यासू लोकप्रतिनिधी अशी प्रतिमा होती. भूदान चळवळीत त्यांनी स्वत:ची जमीन दान देऊन सक्रीय सहभाग घेतला होता. बाबुराव धारवाडे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सेवा यात प्रभावी नेतृत्व केले होते. त्यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार केला. कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासात विशेष योगदान दिले. या शोकप्रस्तावर विधानपरिषदचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विरोधी पक्षनेते धंनजय मुंडेशरद रणपिसेजयंतराव पाटीलकपिल पाटीलडॉ. नीलम गोऱ्हेअनंतराव पाटीलनरेंद्र पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर सभागृहाच्या वतीने सर्व सदस्यांनी दोन मिनिटे मौन पाळून दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहिली.
०००००
वृ. वि. 6182                                                                              1 श्रावण1939 (दु. 2.40)
 दि. 24जुलै,2017
विधानसभा कामकाज :
वंदेमातरमने विधानसभेच्या कामकाजास प्रारंभ
मुंबई, दि. 24 : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आज दि. २४ जुलै रोजीवंदेमातरमने प्रारंभ झाला.
यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमहसूल मंत्री चंद्रकांत पाटीलसंसदीय कार्यमंत्री गिरीश बापटकृषीमंत्री पांडुरंग फुंडकरसहकार मंत्री सुभाष देशमुख,परिवहन मंत्री दिवाकर रावतेग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेपदुम मंत्री महादेव जानकरआदिवासी विकास मंत्री विष्णू सवरासामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोलेपाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकरपर्यावरण मंत्री रामदास कदम आदी राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांसह विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटीलपृथ्वीराज चव्हाणअजित पवार व इतर विधानसभा सदस्य उपस्थित होते.
००००
विधानसभा अध्यक्षांची तालिका जाहीर
मुंबई, दि. 24 : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आज दि. २४ जुलै रोजी प्रारंभ झाला. या अधिवेशन कालावधीसाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभाध्यक्षांची तालिका जाहीर केली असून यामध्ये विधानसभा सदस्य योगेश सागरसुधाकर देशमुखसुभाष साबणेश्रीमती निर्मला गावीत आणि पांडुरंग बरोरा यांचा समावेश आहे.
००००
विधानसभेत दिवंगत सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
       मुंबई दि. 24 : पावसाळी अधिवेशनाच्या आज पहिल्या दिवशी विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी विधानसभा सदस्य दिवंगत शिवाजीराव गिरीधर पाटीलभिकू दाजी भिलारे व निशिकांत माधव जोशी यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला.
             सहकार क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे माजी मंत्री शिवाजीराव पाटील यांनी स्वातंत्र्यसंग्रामात सक्रीय सहभाग घेतला. त्यासाठी त्यांनी कारावासही भोगलाअसे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले,शिवाजीराव पाटील यांनी अनेक सामाजिकसहकारी संस्थामध्ये विविध पदांवर उत्कृष्ट काम केले. त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना 2013साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील भिलारे गुरूजी यांच्या कार्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणालेजावळी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना  विविध सामाजिक संस्थाच्या माध्यमातूनही भिलारे गुरूजींनी भरीव कार्य केले. भिलारे गुरूजींनी सर्वोदय परिवाराच्या माध्यमातून भूदान चळवळीत स्वत:ची जमीन देऊन चळवळ रूजविण्यात मोलाचे योगदान दिले.
कोकण विकासासाठी तळमळीने काम करणारे निशीकांत माधव जोशी यांच्या विषयी भावना व्यक्त करतांना मुख्यमंत्री म्हणालेदैनिक सागर या वृत्तपत्राच्या माध्यमातून दर्जेदार लेखनाद्वारे श्री.जोशी यांनी सातत्याने कोकण विकासाची भूमिका मांडली. शिक्षणसाहित्य,  सांस्कृतिकसामाजिक अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. पत्रकारितेतील कार्याबद्दल त्यांना सह्याद्री वाहिनीतर्फे रत्नदर्पण पुरस्काराने तर कुवैतमध्ये एक्सलन्स ऑफ कोकण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
            मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या शोक प्रस्तावाला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अनुमोदन देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे तसेच मंत्रिमंडळातील सदस्य एकनाथ शिंदेजयकुमार रावलराज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्यासह विधानसभा सदस्य सर्वश्री अजित पवारगणपतराव देशमुखशशिकांत शिंदेभास्करराव जाधवसदानंद चव्हाण यांनीही शोकभावना व्यक्त केल्या. त्यानंतर सभागृहाच्या वतीने सर्व सदस्यांनी दोन मिनिटे मौन पाळून दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहिली.
००००
शैलजा वाघ दांदळे/विसंअ/24/7/17
वृ. वि. 6185                                                                              1 श्रावण1939 (दु. 3.15)
 दि. 24जुलै,2017
शौर्य सेवापदक प्राप्त धारकांना अनुदान देण्यास शासनाची मंजुरी
मुंबईदि. २४ : सैन्यातील सेनापदक आणि अति-विशिष्ट सेवा पदक प्राप्तधारक नायब सुभेदार सयाजी मोरे आणि वाईस एडमिरल मुरलीधर पवार यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेंतर्गत शासकीय अनुदानाची रक्कम देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
            सैन्यातील १४ प्रकारच्या शौर्य/सेवापदक धारकांना शासकीय अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार दि. १५ ऑगस्ट २०१६ रोजी सेना पदक प्राप्त झालेले जेसी ४१३९७६ डब्ल्यू नायब सुभेदार सयाजी उत्तम मोरे मु.पो.अंबेदरे,ता.जि.सातारा यांना ५ लाख ५० हजार तसेच दि.२६ जानेवारी २०१६ रोजी अति-विशिष्ट सेवापदक प्राप्त झालेले ०२४८३ टी वाईस एडमिरल मुरलीधर सदाशिव पवार४२ लोधी इस्टेट मैक्स म्युलर मार्गनवी दिल्ली यांना ८५ हजार रुपयांचे अनुदान देण्यास शासनाने मंजुरी प्रदान केली आहे.
००००

वृ. वि. 6186                                                                              1 श्रावण1939 (दु. 3.15)
 दि. 24जुलै,2017
  दिवंगत माजी राज्यपाल श्री. रा.सू.गवई यांचे प्रेरणादायी जीवनकार्य


  वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, विधान भवन तर्फे
   “अजातशत्रू” स्मृतिग्रंथाचे मंगळवारी प्रकाशन…
           मुंबई, दि. 24 महाराष्ट्र विधानमंडळसचिवालयातील वि.स.पागे संसदीय प्रशिक्षणकेंद्रातर्फे दिवंगत माजी राज्यपाल श्री. रा.सू.उपाख्य दादासाहेब गवई यांचे जीवनकार्य त्यांच्या विधिमंडळ आणि संसदीयकामकाजाच्या योगदानाची माहिती जनतेसहोण्यासाठी अजातशत्रू” या स्मृतिग्रंथाचेप्रकाशन त्यांच्या द्वितीय स्मृतिदिनी उद्या मंगळवारदि. २५ जुलै रोजी, मध्यवर्ती सभागृह,विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यातआले आहे. हे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणिजहाज बांधणी नितीन गडकरी मंत्री तसेच केंद्रीयसामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्रीरामदास आठवले यांच्या हस्ते आणि विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे,उप सभापती, विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, महसूल  सार्वजनिकबांधकाम मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, संसदीयकार्य मंत्री गिरीश बापट, श्रीमती कमलताई गवईयांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
            दिवंगत श्री. रा.सू.गवई यांनी अनेकमहत्वाच्या पदांवर काम करताना आपल्याउल्लेखनीय योगदानाने संसदीय कामकाजावरआपला ठसा उमटविला आहे. सामाजिक आणिसांस्कृतिक चळवळी, शिक्षण अशा बहूविधक्षेत्रातील अनेक व्यक्तींशी दादासाहेबांचेकौटुंबिक  आत्मीय अनुबंध होते. त्यांच्यास्मृतिग्रंथाच्या निमित्ताने महाराष्ट्रातीलमान्यवरांनी आपल्या लेखांद्वारे त्यांच्याव्यक्तिमत्वाच्या अनेकविध पैलूंवर प्रकाश टाकलाआहे. दादासाहेबांनी पीठासीन अधिकारी म्हणूनदिलेले उल्लेखनीय योगदान, भारतीयसंविधानाला अभिप्रेत असणारी सामाजिकन्यायाची चळवळ पुढे नेण्यासंदर्भातील त्यांचेमहत्वाचे कार्य, विधिमंडळ आणि संसदेत त्यांनीव्यक्त केलेले प्रेरक विचार, त्यांची दुर्मीळछायाचित्रे आणि त्यांच्या संदर्भातील मान्यवरांनीलिहिलेल्या भावस्पर्शी  आठवणी या सर्व बाबींचास्मृतिग्रंथात समावेश असल्याने हा स्मृतिग्रंथ एकअमूल्य असा दस्तावेज म्हणून ओळखला जाईल.या स्मृतिग्रंथातील संदर्भ  माहिती राजकीय सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, अभ्यासक आणिलोकप्रतिनिधींना निश्चितच मोलाचे मार्गदर्शन प्रबोधन करणारी ठरणार आहे.
        सदर स्मृतिग्रंथाची पृष्ठसंख्या ५९५ इतकीअसून क्राऊन साइज आकारातील यास्मृतिग्रंथात सर्वसाधारण चार भाग आहेत. ज्यातदादासाहेब गवई यांनी व्यक्त केलेले विचार,विधिमंडळ आणि संसदेतील त्यांची भाषणे,त्यांच्या जीवनकार्यावरील मान्यवरांचे लेख, त्यांचेसंक्षिप्त जीवनचरित्र त्याचप्रमाणे त्यांच्यानिर्वाणानंतर सभागृहातील शोकप्रस्ताव आणिमान्यवरांची आदरांजली यांचा या ग्रंथात समावेशआहे. दासाहेबांचे व्यक्तिमत्त्व सर्वपक्षीय नेत्यांनाआपलेसे वाटणारे होते. सर्व पक्षातील ज्येष्ठनेत्यांचे लेख,ज्येष्ठ पत्रकारांनी जागविलेल्यादादासाहेबांच्या आठवणी, सभागृहातदादासाहेबांनी व्यक्त केलेले विचार अशा सर्वगोष्टी एकत्रितपणे या स्मृतिग्रंथात वाचावयासमिळतील. ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. डॉ.गंगाधर पानतावणे, औरंगाबाद यांची प्रस्तावनाया स्मृतिग्रंथाला लाभली आहे. भारतीयराज्यघटनेने आपल्याला दिलेल्या संसदीयलोकशाहीतील बलस्थानांविषयी आस्थाअसणाऱ्या सर्वांना हा स्मृतिग्रंथ सादर समर्पितकरणारी वैशिष्ट्यपूर्ण अर्पणपत्रिका यास्मृतिग्रंथात आहे.  विषयानुसार रंगीत विभाजक(Separator) असून त्याच्या मागील बाजूवरदादासाहेबांची महत्त्वपूर्ण छायाचित्रे आहेत. उदा.कौटुंबिक जिव्हाळा, चळवळीतील दिवस,विधिमंडळातील भाषणे इत्यादि. दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्यस्मारकाची निर्मिती हे दादासाहेबांचे स्वप्न होते.दीक्षाभूमीला अनेक मान्यवरांनी वेळोवेळी भेटीदिल्या त्या प्रसंगीची छायाचित्रे, दीक्षाभूमीवरीलजनसागरासमवेत असलेले दादासाहेबांचे सेंट्रलस्प्रेड छायाचित्र या स्मृतिग्रंथात बघायला मिळेल.


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111









  























Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *