👁 7 Views

प्रतीक्षा संपली… सोलापूर पासपोर्ट केंद्राचा लोकार्पण सोहळा

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. ! 

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live 

पंढरपूर Live 29 July 2017

प्रतीक्षा संपली… सोलापूर पासपोर्ट केंद्राचा  लोकार्पण सोहळा


सोलापूर- सोलापूरकरांच्या पाठपुराव्यानंतर अखेर पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात येत आहे. अवघ्या सहा महिन्यातच रिपन हॉलचे कोटी ६५ लाख रुपये खर्चून नूतनीकरण करण्यात आले. या पासपोर्ट केंद्राचा लोकार्पण सोहळा शनिवारी सकाळी ११ वाजता केंद्रीय विदेश राज्यमंत्री विजयकुमार सिंह यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करण्यात असल्याची माहिती पासपोर्ट क्षेत्रीय अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी दिली. सोहळ्यास पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार शरद बनसोडे, महापौर शोभा बनशेट्टी, विदेश मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे उपस्थित  आहेत.


सोलापूरसाठी पासपोर्ट कार्यालय मंजूर झाल्यानंतर जागा उपलब्ध होण्यापासून ते प्रत्यक्षात जागा मिळेपर्यंत अनेक अडचणी आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शहरातील ठिकाणी जागा दाखवल्या. त्यापैकी रिपन हॉलची जागा अंतिम करण्यात आली. मात्र ही हेरिटेज वास्तू असून ती पासपोर्ट कार्यालयासाठी देऊ नये, असा सूरही काही संघटनांनी काढला होता. मात्र महापालिकेने ही जागा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पासपोर्ट कार्यालयास हस्तांतर केली. यावेळी तीन महिन्यात कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र निधी मिळाल्यामुळे दुरुस्ती काम पूर्ण होण्यास विलंब झाला. केंद्राकडून निधी मंजूर झाल्यानंतर जानेवारी महिन्यात दुरुस्तीच्या कामास सुरुवात करण्यात आली.

अखेर महापौरांचे नाव केले समाविष्ट

पासपोर्टकार्यालयाने तयार केलेल्या निमंत्रण पत्रिकेत कोनशिलेवर सोलापूरच्या प्रथम नागरिक महापौर शोभा बनशेट्टी यांचे नाव नव्हते. ही चूक लक्षात आल्यानंतर पासपोर्ट कार्यालयाने कोनशिलेमध्ये बदल करीत महापौर यांचे नाव समाविष्ट केले आहे.

शनिवारपासून अपॉइंटमेंट


सोलापूर पासपोर्ट लघु सेवा केंद्राचा लोकार्पण सोहळा आज होणार असून शुक्रवारी रात्री १२ नंतर www.passportindia.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अपॉइंटमेंट उपलब्ध होणार आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याबाबत काही शंका असल्यास १८००२५८१८०० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सोलापूर पासपोर्ट कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111












  






Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *