पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
पंढरपूर Live 29 July 2017
औद्योगिक वापरासाठीच्या साखरेस जादा दर मिळावा- सुधाकरपंत परिचारक.
______________________________ ____
सुधाकरपंत यांच्या कार्याचा कोल्हापूरात गौरव
सुधाकरपंत यांच्या कार्याचा कोल्हापूरात गौरव
______________________________ ____
बेस्ट एम.डी.म्हणून यशवंत कुलकर्णी सन्मानित.
बेस्ट एम.डी.म्हणून यशवंत कुलकर्णी सन्मानित.
————————————————————
आज केन्द सरकार एफ.आर.पी.च्या माध्यमातून साखर कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकर्यांना दर देण्याचा नियम व अमंलबजावणी करते परंतू बाजार पेठेचा विचार केला तर साखरेच्या दरात चढ उतार होत असतो.दर घसल्याने साखर उद्योगावर अनिष्ट परिणाम होउन नुकसान होते त्यामुळे ह्या प्रश्नाची तीव्रता केन्द सरकारच्या नजरेस आणून देवून औद्योगिक करणासाठी वापरणेत येत असलेल्या साखरेस जादा भाव मिळणेसाठी हिंन्दुस्थानभर साखर क्षेत्रात काम करण्यार्या भारतीय शुगरने प्रयत्न करावा असे प्रतीपादन पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन सुधाकरपंत परिचारक यांनी केले.
कोल्हापूर येथे शाहू सांस्कृतिक कला मंदीरा मध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
भारतीय शुगरच्या वतीने सुधाकरपंत परिचारक यांच्या सहकारातील अतुलनिय कार्यावर प्रकाशझोत टाकणारा गौरव अंक काढला असून त्याचे प्रकाशन समारंभात ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की ज्यावेळी बाजारपेठेत साखरेचे दर कमी जास्त होतात त्यावेळी औद्यौगिक वापरासाठी वापरणेत आलेल्या साखरेच्या पदार्थात मात्र बदल होत नाही ते भाव चढेच राहतात मात्र साखर उद्योगास फटका बसतो हा अन्याय दूर होणे गरजेचे आहे.असे ते म्हणाले.
याच कार्यक्रमात देश पातळीवर उल्लेखनिय कार्य करणार्या कारखाने व अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला तर महाराष्ट्रातील साखर उद्यौगातील बेस्ट कार्यकारी संचालक म्हणून पांडुरंगच्याच यशवंत कुलकर्णी यांना स्मृति चिन्ह देवून गौरविणेत आले.
यावेळी व्यासपिठावर माळेगांव शुगरचे माजी चेअरमन चंद्रकांत तावरे,चेअरमन रंजन तावरे,दत्त शुगरचे माधव घाडगे,भारतीय शुगरचे अध्यक्ष विक्रम शिन्दे,उपाध्यक्ष चारुदत्त देशपांडे
उपस्थित होते.प्रथम प्रास्ताविकात विक्रम शिन्दे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.
कार्यक्रमास पांडुरंगचे उपाध्यक्ष वसंतनाना दूशमुखे माजी अध्यक्ष दिनकरभाऊ मोरे,संचालक सुरेश अागवणे,विलास निंबाळकर,आर.बी.पाटील,केन मॅनेंजर रविंद्र साळुंखे,एम.आर.कुलकर्णी,उपस्थित होते.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111












