पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद,
सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
पंढरपूर Live 30 July 2017
सिंधुदुर्ग : देव तारी त्याला कोण मारी या उक्तीचा प्रत्यय सिंधुदुर्गमधील आंबोलीत आलाय. गोव्यातील तरुण प्रवीण नाईक हा आंबोलीत खोल दरीत कोसळला. मात्र दैव बलवत्तर म्हणून प्रवीण दरीत कोसळूनही वाचलाय.
आंबोलीतल्या तरुणांनी त्याला सुखरुपपणे बाहेर काढलंय. शनिवारी सकाळी गोव्याहून प्रवीण नाईकसह नऊ जण खासगी वाहनानं वर्षा पर्यटनासाठी आंबोलीत आले होते.
मुख्य धबधब्याजवळ आनंद घेऊन माघारी परतत असताना असताना प्रवीण हा माकडांना खाद्य घालत होता. यावेळी त्याचा पाय घसरून तो दरीत कोसळला. त्याच्या सोबत असणा-या मित्रांनी आरडाओरड केली.
सुदैवानं प्रवीण दरीत अडकल्यामुळे बचावलाय. या दरीत कोसळल्यावर वाचण्याची शक्यता फार कमी असते. आल्मेडा मित्र मंडळ आणि आंबोलीतल्या तरुणांनी प्रवीणचे प्राण वाचवलेत. सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111











