पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. ! सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
पंढरपूर Live 31 July 2017
आता गणितासाठीही प्रात्यक्षिक परीक्षा
नववीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक सत्राला प्रात्यक्षिक
विज्ञानाप्रमाणेच आता गणितासाठीही प्रत्येक सत्राला प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहेत. शिकलेल्या गणिती सूत्रांची घोकंपट्टी करून परीक्षा देण्याऐवजी आता या सूत्रांचा व्यवहारात वापर करता येतो का, यानुसार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होणार आहे. यंदापासून नववीच्या वर्गासाठी प्रात्यक्षिक परीक्षा लागू होणार आहेत.
यंदापासून नववीचा अभ्यासक्रम आणि मूल्यमापनाच्या पद्धतीत बदल करण्यात आले आहेत.
गणितासाठी पूर्वीप्रमाणेच ८० गुणांची लेखी परीक्षा आणि २० गुण अंतर्गत मूल्यमापन अशीच गुण विभागणी असली तरी आता फक्त चाचण्यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापनाचे गुण विद्यार्थ्यांना पटकावता येणार नाहीत. त्यासाठी वर्षभर शिकलेल्या गणिती संकल्पना, सूत्रे यांचा व्यवहारासाठी वापर करून दाखवावा लागणार आहे. गणितासाठीही विज्ञान विषयाप्रमाणेच आता प्रात्यक्षिक परीक्षा सुरू करण्यात आल्या आहेत. चाचण्यांबरोबर विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकेही करावी लागणार आहेत. गणिताच्या दोन्ही भागांसाठी प्रात्यक्षिके असणार आहेत.
विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारची प्रात्यक्षिके द्यावीत याबाबत पाठय़पुस्तकातच नमुने देण्यात आले आहेत.
नोकरदार व्यक्तीच्या विवरणपत्रावरून त्याला किती आयकर भरावा लागेल याचे गणित मांडणे, औषधाच्या पाकिटावरून प्रत्येक घटकाचे शतमान काढणे, त्रिकोणांची वेगवेगळी मापे घेऊन त्याच्या भौमितिक रचना करणे, एखाद्या खोलीतील सर्व वस्तूंची मापे लक्षात घेऊन प्रमाणबद्ध नकाशा काढणे, संख्यारेषेवरील दोन बिंदूंमधील अंतर काढणे अशा प्रकारच्या प्रयोगातून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे.
गुण विभागणी कशी ?
प्रत्येक सत्रात चाचणी, प्रात्यक्षिके आणि लेखी परीक्षा मिळून गुण गृहीत धरण्यात येणार आहेत. त्यानुसार बीजगणित आणि भूमिती प्रत्येकी ४० गुणांची लेखी परीक्षा असेल, दोन्ही विषयांसाठी प्रत्येकी २० गुणांची चाचणी परीक्षा असेल. चाचणी परीक्षेच्या एकूण ४० गुणांचे १० गुणांत रूपांतर करण्यात येईल. प्रत्येक सत्रात दोन्ही विषयांसाठी प्रत्येकी पाच गुणांचे प्रात्यक्षिक असे एकूण १० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा असेल.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111











