👁 5 Views

पुणे: रुग्णालयात डॉक्टरांकडून उघड झाला बालविवाह

 

पुणे: सासरी नांदत असताना माहेरी आलेल्या बहिणीला ताप आल्यानंतर तिला भावाने दवाखान्यात नेले. त्या वेळी ती गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


परंतु, डॉक्टरांनी तिला तिचे वय विचारले असता व तिचा जन्माचा दाखला पाहिला असता, तिचे वय 17 वर्षे असल्याचे आढळले. त्यानंतर तिचा बालविवाह झाल्याचा प्रकार सातारा येथे उघडकीस आला. 


तिचे लग्न लावून देणार्‍या आई-वडिलांवर व पतीवर सातारा येथील स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तो पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या माहितीनुसार हा गुन्हा कोंढवा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे, असे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक बिराजदार यांनी सांगितले. 


पीडित मुलगी ही 17 वर्षांची असून, तिचा सप्टेंबर 2022 मध्ये पुण्यात कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणार्‍या एका तरुणाबरोबर विवाह झाला होता. मुलाच्या आई-वडिलांनाही आपली होणारी सून ही अल्पवयीन असल्याची माहिती असताना त्यांचे लग्न लावले. डॉक्टरांच्या मध्यस्थीनंतर तिचा नवरा, पीडित मुलीचे आई-वडील आणि सासू-सासरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *