पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. ! सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
पंढरपूर Live 31 July 2017
सिंंहगड – दरड कोसळल्याची माहिती पोलिसांना तब्बल दोन तास उशीरा देण्यात आली
सिंहगड किल्ल्यावर घाट रस्त्यावर दुपारी चारच्या सुमारास मोठी दरड कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. घाट रस्त्यावर वनविभागाने सुरक्षा रक्षक नेमले आहेत तसेच वन विभागाकडून शुल्कही घेतले जाते. रविवार असल्याने नागरिकांची प्रचंड गर्दी किल्लयावर असते. यामुळे पोलिसांचाही वाहतुक सुरळीत करण्यासाठी बंदोबस्त असतो. दरम्यान घटना घडली तिथे वनविभागाचा सुरक्षा रक्षक हजर होता. डोंगराचा भाग कमकुवत झाल्याचे दिसतातच त्याने नागरिकांना वर न जाण्याचा सल्ला दिला. मात्र नागरिक त्याचे ऐकण्याच्या तयारीत नव्हते. यावेळी काही चारचाकी व काही दुचाकी वाहने येथे होती. सुरक्षा रक्षकाने त्यांना थोडा वेळ थांबवून ठेवले होते. दरम्यान मोठा आवाज करत दरड रस्त्यावर कोसळली. यामुळे पुर्ण रस्ता बंद झाला.
नागरिक आणि वनरक्षकांनी हाताने पडलेली दगडे उचलत दुचाकींना जाता येईल असा रस्ता तयार करण्याचा प्रयत्न सुरु केला होत. मात्र मोठा दगड हलवण्यासाठी जेसीबी सारख्या यंत्रणांची गरज होती. तो पर्यंत दुचाकींसाठी वाट करुन देण्यात आली होती. दरम्यान दरड कोसळल्यानंतर तब्बल दोन तासांची याची माहिती हवेली पोलिसांना देण्यात आली. यामुळे सायंकाळी सहाच्या सुमारास हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोल्डे हे पथकासह सिंहगड किल्लयाकडे निघाले होते.
घाट रस्त्यात अडकलेली वाहने माघारी पाठवण्यात येत होती. मात्र वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने वाहन वळवताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत होती. घाटाच्या सुरवातीला असलेल्या वाहन चालकांना दरड कोसळल्याची खबर नव्हती. यामुळे ते पुढेच जात असल्याने वाहतूक कोंडी आणखीनच वाढली होती. पोलिसांनी मुश्किलीने वाहने मागे फिरवून जिल्हा प्रशासन व वन विभागाच्या वाहनांना वाट करुन दिली. तर गडाच्या वरच्या बाजूला अडकलेल्या वाहनांना खेड शिवापुर येथील घाट रस्त्याचा वापर करुन पुणे शहराकडे यावे लागले.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111










