👁 8 Views

गणेशोत्सव मंडळानी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे- सहाय्यक पोलीस अधिक्षक-निखिल पिंगळे

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. ! सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live 

पंढरपूर Live 31 July 2017


पंढरपूर,दि.31 :– गणेशोत्सव शांततेत व मंगलमय वातावरणात पार पाडण्यासाठी  सर्वोच्च न्यायालयाने गणेशोत्सव मंडळासाठी घालून दिलेल्या नियमांचे पंढरपूर तालुका शहरातील गणेश मंडळांनी काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन सहाय्यक पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी केले.
रखुमाई सभागृह, पोलीस संकुल, पंढरपूर येथे शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुका पोलीस निरिक्षक कृष्णदेव खराडे, शहर पोलीस निरिक्षक विठ्ठल दबडे, नायब तहसिलदार एस.पी.तिटकारे,न.पाचे श्री.कुलकर्णी यांच्यासह शहरातील व तालुक्यातील गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, शांतता कमिटीचे सदस्य व प्रतिष्ठित नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….

 गणेशोत्सव डॉल्बीमुक्त करुन शांततेत साजरा करावा तसेच उत्सवाचे पावित्र्य अबाधित राखण्याची जबाबदारी गणेशोत्सव मंडळाबरोबरोच नागरीकांची देखील आहे. या काळात कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहचवणारे कोणतेही कृत्य घडू नये यासाठी मंडळांनी सतर्क रहावे. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून महावितरण कंपनीकडून संबंधित अधिका-यांचे ना-हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. तसेच सुरक्षिततेसाठी गणशोत्सव मंडळांनी सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसवावेत. मंडळांनी विविध सामाजिक उपक्रम राबवावेत. सामाजिक उपक्रम राबविणा-या गणेशोत्सव मंडळाचा प्रशासनाच्या वतीने योग्य सन्मान केला जाईल असेही सहाय्यक पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी सांगितले.
यावेळी तालुका पोलीस निरिक्षक कृष्णदेव खराडे व शहर पोलीस निरिक्षक विठ्ठल दबडे यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी गणशोत्सव मंडळातील अध्यक्ष,पदाधिकारी यांनीही आवश्यक सुचना या बैठकीत मांडल्या. 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *