👁 7 Views

अंगणवाडी सेविकांना इतर कामे देण्यास मज्जाव, महिला बालविकास विभागाने काढले परिपत्रक

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. ! सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live 

अंगणवाडी सेविकांना इतर कामे देण्यास मज्जाव, महिला बालविकास विभागाने काढले परिपत्रक

पंढरपूर Live 1 August 2017

 अंगणवाडी सेविकांना वेगवेगळे कामे करावी लागतात. परंतु अाता महिला बाल विकास विभागाने परिपत्रक काढून अंगणवाडी सेविकांची इतर कामांपासून सुटका केली अाहे. त्यामुळे अाता सेविकांना इतर कामे सांगायची असल्यास थेट शासनाची परवानगी अावश्यक राहणार अाहे.

अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांवर जिल्हास्तरावरून विविध प्रकारची कामे लादली जातात. त्यामुळे मुलांना शिकवण्यावर परिणाम होत असताे. मात्र, आता अंगणवाडी सेविकांना अशी अतिरिक्त कामे लादता येणार नाहीत. कामे सांगायची असल्यास त्यासाठी शासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. महिला बाल विकास विभागाने या संदर्भात परिपत्रक काढले आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकात्मिक बाल विकास सेवा व्यतिरिक्त इतर कामे लादू नयेत. लादायची असतील तर शासनाच्या मान्यता गरजेची आहे, असे परिपत्रकात म्हटले आहे.

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….

एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी उपक्रमात अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी केंद्रात सेविका, मानधनी कर्मचारी कार्यरत असतात. या केंद्राद्वारे बालकांसह गर्भवती, स्तनदा माता यांना पूरक पोषण आहार, पूर्व शालेय शिक्षण सेवा दररोज दिली जाते. तसेच लसीकरण, आरोग्य तपासणी, आरोग्य संदर्भ सेवा, पोषण आरोग्य विषयक शिक्षण या आरोग्य विषयक सेवा आरोग्य केंद्राच्या मदतीने दिल्या जातात. शिवाय इतरही कामे सोपवली जात होती. नव्या आदेशामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होणार आहे.

अंगणवाडीच्या कामकाजावर होत असे परिणाम

अंगणवाडीकेंद्र अंतर्गत एकात्मिक बालविकास योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या कामाचा ताण अधिक आहे. या कामांशिवाय जिल्हास्तरावरून गुड मॉर्निंग पथक , शेततळे बांधकाम, अन्न शिजवून देणे यासारखी कामे त्यांच्याकडे दिली जातात. त्यामुळे अंगणवाडीच्या कामकाजावर परिणाम होत असताे. अाता मात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकात्मिक बाल विकास योजनेच्या व्यतिरिक्त काम द्यायचे असल्यास शासनाची पूर्व मान्यता घ्यावी लागेल. कामे दिल्यास शासन परवानगी आवश्यक असल्याचे आदेशात म्हटले आहे.


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *