👁 8 Views

कपिल शर्माच्या तब्येतीबाबत बोलली ही अॅक्ट्रेस, चार वर्षांपासून करताहेत सोबत काम

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. ! सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live 

कपिल शर्माच्या तब्येतीबाबत बोलली ही अॅक्ट्रेस, चार वर्षांपासून करताहेत सोबत काम


पंढरपूर Live 1 August 2017

मुंबई – ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सरलाचे पात्र साकारणारी सुमोना चक्रवर्ती नुकतीच होस्ट कपिल शर्माच्या आजारपणाबाबत बोलली आहे. एका इंग्रजी वेबसाईटशी बोलताना सुमोना म्हणाली, कपिलची तब्येत फार चांगली नाही. तो सध्या खूप तणावात आहे.


आणखी काय म्हणाली सुमोना..

– सुमोना म्हणाली की, आरोग्याच्या बाबतीत आपण सगळ्यांनीच चढ उतार पहिले आहेत. कधी-कधी तुम्ही स्वतःला आजारपणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करता, पण शरीर साथ देत नाही. पण असे कधी होत नाही, की तुम्ही एखाद्याला वाट पाहायला लावता आणि प्रत्येकाला असे वाटावे की, ही व्यक्ती आजारी आहे. हे वास्तव आहे.

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….

कपिलची साथ सोडली नाही..

मार्चमध्ये ऑस्ट्रेलिया टूरवरून परतताना फ्लाइटमध्ये कपिलबरोबर भांडण झाल्याने सुनील ग्रोवर आणि चंदन प्रभाकरने शो सोडला होता. त्याच्या सपोर्टमध्ये अली असगर, सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले यांच्यासह क्रिएटिव्ह हेड प्रिती सिमोस यांनीही शो सोडला होता. पण सुमोना त्या परिस्थितीतही कपिलबरोबरच राहिली.

चार वर्षांपासून करतेय कपिलबरोबर काम, वाचा पुढील स्लाइड्सवर…


4 वर्षांपासून करतेय कपिलबरोबर साथ काम..

सुमोना कपिलबरोबर चार वर्षांपासून काम करत आहे. सुरुवातीला ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ (2013-16) मध्ये ती कपिलची पत्नी मंजूची भूमिका करत होती. त्यानंतर ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये ती कपिलची शेजारी सरला गुलाटीच्या भूमिकेत आहे.


अनेक मालिकांत केले काम

‘द कपिल शर्मा शो’ आणि ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ शिवाय सुमोनाने दूरदर्शनवर ‘कब क्यो कैसे’ (2009), झी टीव्हीवर ‘कसम से’ (2006-2009), बिंदासवर ‘सुन यार चिल मार’ (2007 ), स्टार प्लसवर ‘कस्तुरी’ (2007-2009), आणि सोनी एंटरटेनमेंट चॅनलवर ‘बडे अच्छे लगते है’ (2011-2014), सारख्या शोमध्ये झळकली आहे. अॅक्टींगबरोबरच ती मॉडेलिंगसाठीही प्रसिद्ध आहे.


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *