👁 8 Views

औचित्याच्या मुद्दयाव्दारे सकल मराठा समाजाच्या आरक्षण मागणीबाबत आ.भारत भालके यांनी सभागृहामध्ये उठविला आवाज…!

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. ! सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live 

पंढरपूर Live 1 August 2017

पंढरपूर ः दि.1 –  सध्या चालू असलेले पावसाळी अधिवेशनामध्ये मंगळवार दि.01.08.2017 रोजी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री भारत भालके यांनी विधानमंडळात सकल मराठा समाजाचे आरक्षण मागणीबाबत राज्य शासनाने अद्यापही कोणतीच ठोस अशी कार्यवाही केलेली नसल्यामुळे  मुंबई येथे बुधवार दिनांक 09.08.2017 रोजीचे मार्चाचे वास्तवदर्शन संपुर्ण सभागृहाला व मुंख्यमंत्री यांना त्यांच्या मुद्देसुद भाषणाने करुन दिले व या मराठा समाजाला शैक्षणिक,सामाजिक व सर्वच स्थरावर आरक्षण देणेबाबत लवकरात लवकर तातडीने निर्णय घेणेची विनंतीबाबत महाराष्ट्र विधानसभा नियम औचित्याचा मुद्दा उपस्थित करुन विधानमंडळाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्दयावर संपूर्ण महाराष्ट्र पेटला असून लाखो-करोडो समाजबांधव आपल्या संपूर्ण परिवारासह या मुंबई नगरीत धडकणार आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये  कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्‍न निर्माण होणार आहे. त्यामुळे शासनाने याबाबत सभागृह सुरु आहे, त्यासंदर्भात चर्चा करुन मराठा समाजाला ठोस आश्‍वासन द्यावे.

मराठा तरुण वर्ग शैक्षणिक आरक्षण नसल्यामुळे एम.पी.एस.सी.,यु.पी.एस.सी. परीक्षेत एका मार्काने निवड न झालेमुळे व मराठा समाजाचा पारंपारीक शेती व्यवसायही संकटात आहे या सर्व बाबीमुळे मराठा समामध्ये ङ्गार मोठी नाराजीची भावना आहे, या मराठा समाजाचा अंत या राज्य सरकारने पाहू नये अन्यथा हा सकल मराठा मोर्चा पेटून उठेल व परिणामी मोठा अनर्थ घडेल. त्यामुळे शासनाने मराठा समाजाला आरक्षण देवून या सकल मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या  तातडीने मान्य करण्याबाबत राज्य शासनाकडे संपूर्ण सभागृहाच्या माध्यमातून पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार श्री भारत भालके यांनी विनंती मागणी केली.
मराठा व धनगर दोन्ही समाज ग्रामीण भागात शेती व्यवसाय करतात. निसर्गाचा लहरीपणा, द्ुष्काळ या सर्व संकटावर मात करवयाची असल्यास या दोन्ही समाजाला आरक्षण देवून दोन्ही समाजाला न्याय द्यावा, अशी ठोस मागणी आमदार भारत भालके यांनी सभागृहामध्ये केली.

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *